संरक्षक कठडय़ांअभावी अपघाताला आमंत्रण

By Admin | Updated: January 16, 2017 01:13 IST2017-01-16T01:13:17+5:302017-01-16T01:13:17+5:30

सावरखेडापासून डोंगरगाव व सातपुडा साखर कारखाना रस्त्यादरम्यान वळण रस्त्यावरच नाल्यावर बांधण्यात आलेल्या पुलास संरक्षक कठडे बांधले न गेल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आह़े

Invitation to accident due to guardian | संरक्षक कठडय़ांअभावी अपघाताला आमंत्रण

संरक्षक कठडय़ांअभावी अपघाताला आमंत्रण


शहादा : तालुक्यातील सावरखेडापासून डोंगरगाव व सातपुडा साखर कारखाना रस्त्यादरम्यान वळण रस्त्यावरच नाल्यावर बांधण्यात आलेल्या पुलास संरक्षक कठडे बांधले न गेल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आह़े कठडे त्वरित बांधण्याची मागणी  राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनिल भामरे यांनी केली आह़े
शहाद्यातून डोंगरगावमार्गे सावखेडा-असलोर मंदाणा रस्ता जातो़ त्याचप्रमाणे  लोणखेडा-पुरुषोत्तम नगर हा रस्ता सावखेडय़ाकडून जातो़ पुरुषोत्तमनगर ते डोंगरगावकडून सावखेडय़ा गावाच्या अलीकडे 500 मीटर अंतरावर नाला आह़े यावर काही वर्षापूर्वी लहान पूल बांधण्यात आला होता़ त्यामुळे अनेक ग्रामीण भागाशी संपर्क होणे शक्य होत होत़े पुलावर कठडे नसल्याने यात्रोत्सवात भाविकांनादेखील समस्या निर्माण होत आह़े अपघातांच्या घटना रोखण्यासाठी लवकर पुलावर कठडे बांधण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आह़े(वार्ताहर)

Web Title: Invitation to accident due to guardian