शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:32 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत सर्व विद्यार्थी हे गेल्या अनेक महिन्यांपासून घरातच बसून आहेत. या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक विभागातर्फे विविध उपक्रम राबविले ...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत सर्व विद्यार्थी हे गेल्या अनेक महिन्यांपासून घरातच बसून आहेत. या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक विभागातर्फे विविध उपक्रम राबविले जात असतात. त्यातच रोटरी डिस्ट्रीक्ट ३०६० आणि सिंपल डीड्स फाऊंडेशनतर्फे संपूर्ण रोटरी डिस्ट्रीक्टमध्ये प्रतिभा प्रेरक कहाणी हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात प्रेरणादायी कथांचे संकलन करण्यात आले असून ही प्रेरणादायी कथा व्हिडिओच्या स्वरूपात असते. या व्हिडिओमधील कथा हिंदी भाषेत भाषांतरित केलेल्या आहेत. या प्रेरणादायी कथांचे सचित्र कथन या व्हिडिओत दाखविले जाते. दर आठवड्याला एक प्रेरक कहाणीचा व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत नंदुरबार जिल्हा माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या मदतीने पाठविण्यात येतो. या व्हिडिओतून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. रोटरी डिस्ट्रीक्ट ३०६० चा प्रतिभा-प्रेरणादायी कहाणी हा उपक्रम नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक या शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या शैक्षणिक व्हाॅट्सॲप ग्रुपवर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या मदतीने पाठविण्यात येतो. या व्हिडिओतून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. रोटरी डिस्ट्रीक्ट ३०६० चा हा प्रतिभा - प्रेरणादायी कहाणी हा उपक्रम नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी व माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात रोटरी क्लब ऑफ नंदनगरी नंदुरबार यांच्यामार्फत राबविण्यात येत असून प्रतिभा - प्रेरणादायी कहाणी संग्रह हा अभिनव उपक्रम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या व्यतिरिक्त अवांतर व्हिडिओची मेजवानी मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील १३८९ प्राथमिक शाळा तर ३८३ माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांपर्यंत या उपक्रमातील प्रेरणादायी व्हिडिओ पोहोचत आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष नागसेन पेंढारकर, सचिव मनोज गायकवाड, लिटरसी चेअरमन सैय्यद इसरार अली, देवरे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रोटेरियन दिनेश साळुंखे, फय्याझ खान, इक्बाल शेख, प्रितिश बांगड, किरण दाभाडे, आकाश बेदमुथा, अनिल शर्मा आदी. परिश्रम घेत आहेत.