तळोद्यात टरबूजावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:13 IST2019-04-04T12:13:35+5:302019-04-04T12:13:40+5:30
तळोदा परिसर : शेतकऱ्यांचे होतेय आर्थिक नुकसान, उपाय योजना व्हावी

तळोद्यात टरबूजावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव
्नरांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह परिसरात टरबूज या वेलवर्गीय पिकावर करपा व डावणी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे़ पिकांची वाढ खुंटली असल्याने साहजिकच शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे़ कृषी विभागाकडून संबंधित परिसराची पाहणी करण्यात आली असून विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांकडून बुरशीनाशकांची फवारणी केली जात आहे़
परिसरात कुपनलिकांची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे़ त्यामुळे परिसरातील शेतकºयांकडून ठिबकवर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे़ टरबूज पिकाला जेमतेम पाणी देणे सुरु आहे़ सध्या परिसरात चांगलेच तापत असल्याने या वेलवर्गीय पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे़
करपा रोगात पानांवरील लव अधिक असल्याने वेल जमिनीवर पसरत जात आहेत़ दमट हवामानामुळे वेलांची पाने गळत आहेत़ तर डावणीच्या प्रादुर्भावात वेल पिवळे पडत असल्याचे दिसून येत आहे़ शेंड्याची पाने बारीक होत असून फळधारणाही कमजोर होत आहे़ त्यामुळे शेतकºयांकडून चिंता व्यक्त केली जात आहे़ बहुतेक शेतकºयांकडून बुरशीनाशकांची फवारणी करण्यात येत आहे़
दरम्यान, शेतकºयांकडून टरबूज लागवडीसाठी महागडे बियाणे, ठिबक, माल्चिंग पेपरसह मजुरी यावर आधीच मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात आला आहे़ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने टरबूजाची वाढ खुंटली आहे़ तसेच त्याच्या दर्जाही खालावला असल्याचे टरबूज उत्पादक शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़ त्यामुळे साहजिकच बाजारात अशा टरबूजाला मागणीही नसल्याने याचा सरळ परिणाम शेतकºयांच्या उत्पन्नावर होणार असल्याचे स्पष्ट होत आहे़
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हवामानातही फारमोठे वेगवान बदल झालेले दिसून आले़ आता सध्या परिसरात तीव्र उन्ह पडत असल्याने साहकिच पिकांना पाण्याची मागणी वाढली आहे़ त्यातच दुष्काळी स्थितीमुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत आहे़ त्यामुळे टरबूज पिकाला पुरेशा प्रमाणात पाणी देणे शक्य होत नाही़ त्यामुळे करपासारखे संधीसाधू आजारांचा पिकांवर प्रादुर्भाव होत असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले आहे़
परिसरातील टरबूज उत्पादक शेतकरी भारतसिंग गिरासे यांनी सांगितले की, माल्चिंग पेपरच्या सहाय्याने ठिबक सिंचनावर टरबूज पिकाची लागवड केली होती़ तसेच सुक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी व ठिबकमधून विद्राव्य खतांचा वापर केल्याने हे वेलवर्गीय पिक चांगले बहरले होते़ परंतु दमट हवामानामुळे व पाणीटंचाईमुळे पिकांवर करपा सारखे रोग होत आहेत़ त्याच प्रमाणे विविध रोगांमुळे पिकांचा दर्जा खालावत असून बाजारात अशा फळाला मागणी नसल्याने समस्या निर्माण होते़