शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

नवापुर तालुक्यात मुंबईमार्गाने कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 12:09 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार /विसरवाडी : शहादा व नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील प्रत्येकी एकास कोरोनाची बाधा झाल्याचा रिपोर्ट सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार /विसरवाडी : शहादा व नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील प्रत्येकी एकास कोरोनाची बाधा झाल्याचा रिपोर्ट सोमवारी रात्री प्राप्त झाला होता़ या रिपोर्टमुळे कोरोनामुक्त नवापूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले असून विसरवाडी व परिसरातील दोन गावे सील करण्यात आली आहेत़ दरम्यान शहाद्यात आढळलेला रुग्ण हा प्रभाग क्रमांक सातमधील रझा मशिद परिसरातील रहिवासी आहे़सोमवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात विसरवाडी येथील ४८ वर्षीय आणि शहादा येथील ४१ वर्षीय पुरुष असे दोघेही पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती़ दोघेही जिल्हा रुग्णालयात दाखल असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरु होता़ यातून विसरवाडी, गडदानी आणि माचोहोंडा ता़ नवापुर येथील तब्बल ३१ जण क्वारंटाईन करण्यात आले आहेत़ या सर्वांना नवापुर येथील क्वारंटाईन कक्षात रवाना करण्यात आले़ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी दाखल झाले होते़मंगळवारी विसरवाडी येथे अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील, तहसीलदार सुनिता जºहाड, गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ हरीश्चंद्र कोकणी, विस्तार अधिकारी दिलीप कुवर यांनी भेट देत माहिती घेतली़नवापुरच्या अधिकाऱ्यांचा जंगलात झाला मुक्कामलोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापूर तालुक्यातील ४८ वर्षीय व्यक्तीचे स्वॅब पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासन कामाला लागले होते़ या व्यक्तीचे मूळगाव असलेल्या गडदाणीपर्यंत जाण्यासाठी रात्री रस्ता न मिळाल्याने अधिकारी, आरोग्य विभागाचे पथक रात्रभर जंगलात मुक्कामी होते़मुंबई येथून गडदाणी ता़ नवापूर येथे आलेल्या संबधित व्यक्तीने खाजगी रुग्णालयात भेट दिली होती़ यावेळी त्याने रुग्णालयात शेतकरी असल्याचे सांगून माहिती लपवली होती़ दरम्यान विसरवाडी येथे बाजार करत येथील एका सलूनमध्ये दाढी-कटिंग केली होती़ कोरोनाबाधिताचे गडदाणी येथे घर बांधले जात असल्याने विसरवाडी येथे बांधकाम मटेरीयल खरेदी केले होते़मुंबई येथून परतलेल्या या व्यक्तीचा तालुक्यातील माचाहोंडा, गडदाणी आणि सासरवाडी असलेल्या बोरपाडा या गावाशी संपर्क आला आहे़या पार्श्वभूमीवर रात्रीच आरोग्य यंत्रणेच्या पथक माचाहोंडा येथे दाखल होवून संपर्कांना क्वारंटाईन केले होते़ त्यानंतर हे पथक गडदाणी येथे निघाले होते़ मात्र दोन किलोमीटर अंतरावर कच्चा रस्ता असल्याने पथकाला तेथेच थांबावे लागले़ शेजारील गावातून एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह गडदाणी येथे पाठवून त्यातून संपर्कात आलेल्यांना आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती़ हे सर्व पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु असल्याने अधिकारी व वैद्यकीय पथक हे जंगलातच तळ ठोकून होते़ सर्वांना नवापुर येथे रवाना केल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नवापुरकडे रवाना झाले होते़रेल्वेस्थानकाला लागुन असलेल्या गुजरातच्या उच्छल हनुमानफळीतील २४ वर्षीय कोरोना पॉझीटीव्ह महिलेस मंगळवारी गुजरातमधील तापी जिल्हा सामान्य रुग्णालयाने डिस्चार्ज दिला आहे़ महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे़ ही महिला १८ मे रोजी अहमदाबाद येथून परतल्यावर होम क्वॉरंटाईन झाली होती. २२ मे रोजी कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने तिचा स्वॅब घेण्यात आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला व्यारा येथील येथे दाखल करण्यात आले होते. शहर सीमेला लागून असलेल्या भागातून कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आल्याने खबरदारीचा उपाय म्हणुन नवापूर शहर हद्दीतील सर्व भाग सील करण्यात आला होता.