शहादा विभागातील दीड हजार शेतक:यांना मिळणार स्वतंत्र रोहित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 12:51 IST2018-12-06T12:51:45+5:302018-12-06T12:51:49+5:30
वीज कंपनी : वीज गळती रोखण्याचा प्रयत्न

शहादा विभागातील दीड हजार शेतक:यांना मिळणार स्वतंत्र रोहित्र
बोरद : वीज कंपनीने वीज गळती रोखून कृषीपंपधारक शेतक:यांना वेळेवर वीज पुरवठा करण्यात यावा यासाठी बिरसा मुंडा वीज पुरवठा योजनेंतर्गत स्वतंत्र रोहित्र देण्याची योजना आणली आह़े वीज कंपनीच्या शहादा विभागात प्रथमच 1 हजार 330 शेतक:यांना या लाभार्थीना योजनेचा लाभ मिळणार असून डिसेंबरअखेर शेतशिवारात स्वतंत्र रोहित्र सुरु होणार आहेत़
वीज कंपनीच्या शहादा विभागातील धडगाव, तळोदा, शहादा आणि अक्कलकुवा या चार तालुक्यात 32 हजार कृषीपंपधारक शेतकरी आहेत़ या शेतक:यांना पिकांना पाणी देण्यासाठी करण्यात येणा:या वीज पुरवठय़ाबाबत अडचणी येत होत्या़ कृषीपंपांसाठी दिलेले रोहित्र नादुरुस्त झाल्यास शेतक:यांना पिकांचे संगोपन करण्यात अडचणी येत होत्या़ जादा क्षमतेचा रोहित्र देताना कंपनीकडून वेळ लावला जात होता़ यावर मार्ग काढत बिरसा मुंडा योजनेतून स्वतंत्र रोहित्र आणि वीज खांब देण्याची तयारी गेल्या काही महिन्यापासून वीज कंपनीने चालवली होती़ यातून शहादा तालुक्यात 742, तळोदा 409, अक्कलकुवा 172 तर धडगाव तालुक्यात 7 असे एकूण 1 हजार 330 कृषीपंपधारकांची निवड करण्यात आली असून त्यांना स्वतंत्र खांब आणि रोहित्र देण्यात येणार आह़े यामुळे या शेतक:यांना नियमित दाबाने वीज उपलब्ध होणार असून वीज गळती थांबणार आह़े
या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असून रोहित्रावर साधारण 15 हॉर्सपावरची मोटार सुरळीतपणे सुरु राहणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े वीज कंपनीकडून सुरु करण्यात येत असलेल्या या कामाबाबत शेतक:यांनी समाधान व्यक्त केलेआह़े