शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पलासखोब्रा व बुंदेमालपाडा येथे बेमुदत धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST

तालुक्यातील व सातपुड्याच्या डोंगराळ भागातील वेलखेडी, सांबर व पलासखोब्रा येथील पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यांच्या घाट सेक्शनच्या चढावावर घाट चढाव ...

तालुक्यातील व सातपुड्याच्या डोंगराळ भागातील वेलखेडी, सांबर व पलासखोब्रा येथील पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यांच्या घाट सेक्शनच्या चढावावर घाट चढाव कमी न केल्याने व आवश्यक वळणावर कटिंगदेखील व्यवस्थित करण्यात आले नाहीण गाडीला वळण लागत नसल्याने, आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंतीसह संरक्षण कठडे बांधले नसल्याने या रस्त्याच्या कामामुळे घाट चढाव व चारचाकीला वळण लागत नसल्याने एस.टी.बस देखील येऊ शकणार नसल्याने या परिसरातील पाड्यांवरील नागरिकांना गैरसोयीचे होत आहे.

या रस्त्याच्या कामासाठी तसेच पलासखोब्रा गावाच्या मांडवीचापाडा, मोजरापाडा, पिपलाआडीपाडा येथे विजेची सोय नसल्याने हे पाडे अंधारात असल्याने व डेब्रामाळ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कंजाला, डेब्रामाळ, सांबर, वेलखेडी येथे सीमा मोजणीचे काम अपूर्णावस्थेत, गावठाण स्मशानभूमीचे मोजणीचे काम पूर्ववत मोजणी करून मिळावे या मागण्यासाठी संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर २८ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून वाघदेवाच्या शेजारी बुदेमालपाड्यात बेमुदत धरणे आंदोलन व चूलबंद आंदोलन करण्याचे नियोजन पलासखोब्रा येथे ग्रामसभेत करण्याचे नियोजन होऊन या संदर्भात संंबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देेण्यात आले आहे.

तालुक्यातील वेलखेडी, कौलीदापाडा, सांबर, सारबारीपाडा, पाटीलपाडा, बुंदेसांबरपाडा, बारीवेसपाडा, पलासखोब्रा, डिगड्यापाडा, साबाचापडा, पाटीलपाडा, बारीपाडा, आमलीदोपाडा, पिपलाडीपाडा अशा या रस्त्याचे २०१८-१९ मध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत काम सुरू असून, या घाट सेक्शनचा चढाव रस्त्यावरदेखील कमी करण्यात येत नसून, वळणाचा भागदेखील व्यवस्थित कटिंग केला जात नसल्याने तसेच आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंतीदेखील बांधल्या नसल्याने या रस्त्यावर एस.टी. महामंडळाची बसेसदेखील येऊ शकणार नाहीत. वेलखेडी, साबंर, पलासखोब्रा या रस्त्यावर दिगडबारी, साबाचापडा, मोहाडीखेत, फाफालपाडा, बारीपाडा, आवलीपाडा या भागात वळणाचा भागदेखील कटिंग केला नसल्याने साध्या वाहनादेखील वळविता येत नाही. तसेच घाटाचा भाग असतानादेखील चढाव कमी करण्यात आले नाही. आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंत व संरक्षण कठडे नसल्याने धोकेदायक असल्याने या रस्त्याच्या कामावर संरक्षण भिंतीचे काम व्यवस्थित होत नाही. तसेच पलासखोब्रा गावाच्या मांडवीचापडा, मोजरापाडा, पिपलाआडीपाडा येथे विजेची सोय नसल्याने हे पाडे अद्यापपर्यंत अंधारात असल्याने व डेब्रामाळ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कंजाला, डेब्रामाळ, सांबर, वेलखेडी येथे सीमा मोजणीचे काम अपूर्णावस्थेत, गावठाण स्मशानभूमीचे मोजणीचे काम पूर्ववत मोजणी करून मिळावे या मागण्यांसंबंधीत विभागाकडून पूर्ण करण्यात येत नसल्याने अखेर बेमुदत धरणे आंदोलन व चूलबंद आंदोलन करण्याचे नियोजन पलासखोब्रा येथे ग्रामसभेत करण्यात आले आहे.

यासंदर्भात रामसिंग वळवी कंजाला, भिमसिंग राज्या वळवी वेलखेडी, दिलीप कोट्या वळवी पलासखोब्रा, बटेसिंग वळवी, राजेंद जहागींर वळवी, रमेश मोयला वळवी, सामा खात्र्या वळवी, सायसिंग रणज्या वळवी, दिवल्या सोमता वळवी, बिजला नायका वळवी यांनी नायब तहसीलदार अजित शिंत्रे यांना निवेदन दिले आहे.

या सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील वेलखेडी, पलासखोब्रा, डेब्रामाळ, कंजाला, डनेल, सुरवाणीपाडा, भगदरीचा वणवाईपाडा, साबंर याठिकाणी चांगले रस्ते नसल्याने वाहने जाण्यास अडचणी येत आहेत. तसेच आरोग्य सुविधादेखील देता येत नाही. तसेच या भागात बसेस आल्यास या भागातील विद्यार्थ्यी शिक्षणासाठी मोलगी येथे जाऊ शकतील व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

- रायसिंग दुधल्या वळवी, कंजाला.