मतदानासाठीचा वाढलेला उत्साह दुपारी काहीसा थंडावला : नंदुरबार नगरपालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 15:24 IST2017-12-13T15:22:09+5:302017-12-13T15:24:05+5:30

Increased enthusiasm for voting was a little cooler in the afternoon: Nandurbar municipality | मतदानासाठीचा वाढलेला उत्साह दुपारी काहीसा थंडावला : नंदुरबार नगरपालिका

मतदानासाठीचा वाढलेला उत्साह दुपारी काहीसा थंडावला : नंदुरबार नगरपालिका

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार व नवापूर येथील नगरपालिका निवडणुकीसाठी दुपार्पयत अनुक्रमे 35 व 23 टक्के मतदान झाल़े सकाळी 10 ते 12 दरम्यान मतदानासाठीचा वाढलेला उत्साह दुपारी काहीसा थंडावला असल्याचे जाणवल़े परंतु दुपारनंतर पुन्हा मतदार मतदानासाठी येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून मतदानाच्या स्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आह़े मतदान केंद्राच्या शंभर मीटर्पयतच्या परिसरात जमावाला उभे राहण्यास तसेच वाहन लावण्यास मनाई करण्यात येत आह़े 
तथापिसकाळी साडेसात वाजेपासून नंदुरबार व नवापूर पालिकेसाठी मतदानाला सुरुवात करण्यात आली़ दोन्ही ठिकाणी सकाळी थंडीचा जोर जाणवत असल्याने मतदानासाठी तुरळक गर्दी दिसून येत होती़ परंतु 10 नंतर मात्र मतदारांची चांगलीच गर्दी दिसून आली़ नंदुरबार व नवापूर येथील विविध मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या होत्या़  दरम्यान, नंदुरबार शहराच्या चौकांमध्ये नागरिकांकडून राजकीय चर्चा रंगताना   दिसून येत होत्या़ अत्यंत चुरशीच्या नगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार या विषयांवर चर्चाना उधाण आले होत़े शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनाद करण्यात आलेला आह़े 

Web Title: Increased enthusiasm for voting was a little cooler in the afternoon: Nandurbar municipality