आदिवासी बांधवांमध्ये मध उद्योगाचा वाढता गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:50 IST2020-01-01T12:50:49+5:302020-01-01T12:50:56+5:30

शरद पाडवी । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्याच्या वनोपज व नैसर्गिक साधनांमध्ये योगदान देणाऱ्या ठिकाणांमध्ये नंदुरबार जिल्हा एक ...

Increase the honey industry among the tribal brothers | आदिवासी बांधवांमध्ये मध उद्योगाचा वाढता गोडवा

आदिवासी बांधवांमध्ये मध उद्योगाचा वाढता गोडवा

शरद पाडवी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुड्याच्या वनोपज व नैसर्गिक साधनांमध्ये योगदान देणाऱ्या ठिकाणांमध्ये नंदुरबार जिल्हा एक आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी दाट जंगल असून मधासाठी आवश्यक फुलोरा व परागीकरणास अनुकुल वातावरणही आहे, त्यामुळे अस्सल मध मिळते. परंतु जिल्ह्यात मधमाशाचे पालन करीत उत्तम शेतीपुरक व्यवसायही करता येतो, ही बाब क्वचितच नागरिकांना माहित आहे. परंतु महाराष्टÑ राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत प्रशासनाने जिल्ह्यातील परागीकरणाचा आढावा घेतला, त्यात मधमाशी पालक केंद्रांसाठी पोषक वातावरण असल्याचे आढळून आले.
प्राप्त आढाव्यानुसार खादी व ग्रामोद्योग मंडळाने जिल्ह्यात शेतकऱ्यांना मधमाशी पालन केंद्र उपलब्ध करुन देण्यासाठी सुरुवात केली. त्या पाठोपाठ आत्मा. फलोत्पादन, हार्टीकल्चर, कृषी अशा काही विभागांमार्फत मधमाशी पालन केंद्र दिले जात आहे. याचा लाभ घेणाºया लाभार्थ्यांना आधुनिक पद्धतीने मध व्यवसाय करण्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे. त्यामुळे सातपुड्यातील पारंपरिक सद्यस्थितीत जिल्ह्यात २०० लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदानावर केंद्र देण्यात आले आहे. त्यात तोरणमाळ गावासह नवापूर तालुक्यात सर्वाधिक लाभार्थी आहे. तर अक्कलकुवा तालुक्यात डाब भागातील शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुन्हा ग्रामोद्योग मंडळातर्फे लवकरच प्रशिक्षण घेतले जाणार असून हे इच्छुक लाभार्थ्यांना मध्यवर्ती ठरेल अशा ठिकाणी प्रशिक्षण ठेण्यात येणार असल्याचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी आर.व्ही.अकोले व मधुक्षेत्रीक करमसिंग वसावे यांनी सांगितले. पुढील प्रशिक्षणासाठी मधुक्षेत्रिक वसावे यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

जिल्ह्यातील मध उद्योग वाढीसाठी खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशी पालक किट ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करुन दिले जात आहे. त्यात आग्या या प्रकाराच्या माशांच्या किटची किंमत चार हजार ५०० रुपये आहे. त्यात माशांसह सर्वच आवश्यक साधनांचा समावेश आहे. लाभार्त्यांना १० किट घेणे अनिवार्य असून त्याची एकुण किंमत ४५ हजार होते. त्यात ५० टक्के निधी शासनाकडून दिले जातात. तर निम्मी रक्कम लाभार्थ्यांना उभारावी लागते. या योजनेला चांगला प्रतिसाद लाभत आहे.

मध हा घटक नैसर्गिक असून ज्या पोळ्यांमध्ये जंगली मध तयार होत, त्यातून मध काढत जमा करणे अवघड जाते. त्यामुळे मधमाशी पालन केंद्रातील मधमाश्यांना लाकडी खोक्यांमध्ये मधाची पोळ बांधण्यास अनुकुल वातावरण तयार केले जाते. मधमाशा प्रामुख्याने जांभूळ, करंज, निलगिरी, मोहरी, लिची, शेवगा, सूर्यफूल, हिरडा, बेहडा, सावर, गुलमोहर, शिकेकाई, पांगरा, अंजन व पळस ओमरेंदा आदी वनस्पतींची आवश्यकता भासते, या वनस्पतींच्या फुलोºयातून मध गोळा करतात.

Web Title: Increase the honey industry among the tribal brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.