सारंगखेडा-कुकावल रस्त्यावर वृक्ष जाळण्याच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 12:11 IST2020-05-31T12:11:03+5:302020-05-31T12:11:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कळंबू : सारंगखेडा ते कुकावल रस्त्यालगत असलेले वृक्ष अज्ञातांकडून मुद्दामहुन काडी कचरा जाळण्याच्या नादात जाळले जात ...

सारंगखेडा-कुकावल रस्त्यावर वृक्ष जाळण्याच्या घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबू : सारंगखेडा ते कुकावल रस्त्यालगत असलेले वृक्ष अज्ञातांकडून मुद्दामहुन काडी कचरा जाळण्याच्या नादात जाळले जात आहे. यामुळे वृक्षांना जाळून मोठी हानी होत आहे.
अनेक वर्षांपासून उभे असलेले डेरेदार वृक्ष जे उन्हाळ्यात मनुष्य व प्राणीमात्रांना छाया देतात व आकाशात उडणाऱ्या पक्षांना विसावा देतात अश्या हिरवेगार व डेरेदार वृक्षांच्या जाळपोळीच्या घटनांमुळे मोठी हानी होत आहे. त्यामुळे परिसरातील वृक्षमित्रांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
एकीकडे महाराष्ट्र सरकार पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ३३ कोटी वृक्षांची लागवड करते व त्यात किती वृक्ष जगली हा संशोधनाचा विषय आहे. परंतु अश्या वृक्ष जाळपोळीच्या घटनांमुळे अनेक वर्षांपासून पर्यावरणाच्या सौंदर्यात भर घालणाºया वृक्षांची हानी होत असल्याने अश्या घटना न होता.
वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें !
पक्षी ही सुस्वरें आळविती!
या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओवीतून मानवाने बोध घेऊन वृक्षांना आपले मित्र समजून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष जोपासना व संगोपन करणे हीच काळाची गरज आहे. तरी संबंधीत वन विभागाने वृक्ष जाळपोळीच्या घटनांची दखल घ्यावी अशी, मागणी वृक्ष मित्रांकडून होत आहे.