शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे थाटात उद्घाटन करण्यात आले़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे थाटात उद्घाटन करण्यात आले़ गाडगे बाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे यांच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेचे यंदाचे दहावे वर्ष आहे़ स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा कल्चरल अ‍ॅकडमीचे अध्यक्ष मनोज रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले़स्पर्धेच्या उद्घाटन समारंभापूर्वी दोन तर उद्घाटनानंतर आठ अशा दहा एकांकिका दिवसभरात सादर झाल्या़ एकांकिकांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत राज्यभरातून आलेल्या कलावंतांचे कौतूक केले़ उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यीक दिनानाथ मनोहर, सिने दिग्दर्शक शाम रंजनकर, किरण तडवी, मिलिंद पहुरकर, उद्योजक शितलभाई पटेल, नगरसेवक रविंद्र पवार, डॉ.राजकुमार पाटील, संजय चौधरी, पत्रकार रमाकांत पाटील, रणजीत राजपूत, रोटरी नंदनगरीचे अध्यक्ष प्रितिष बांगड, डॉ.चेतन चौधरी, प्रभाकर भावसार, मिरा मनोहर आदी उपस्थित होते.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वल करण्यात येऊन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले़ कार्यक्रमात बोलताना मनोज रघुवंशी यांनी सांगितले की, जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेमुळे महाराष्ट्र राज्याच्या नाट्य चळवळीत नंदुरबारचे नाव कोरले गेले आहे़ या स्पर्धेमुळे नंदुरबार जिल्ह्यातील नाट्यचळवळीला नवसंजीवनी प्राप्त झाली आहे़यावेळी नाटककार तथा स्पर्धेचे परीक्षक रविंद्र लाखे यांनी सांगितले की, जिभाऊ करंडक राज्यस्तरीय स्पर्धेत सातत्य ठेवल्यास नक्कीच नंदुरबार येथून कलावंत व नाट्य तंत्रज्ञ उदयास येतील. नंदुरबारात ९ वर्षांपासून सातत्याने सुरु असलेला हा उपक्रम प्रेरणादायी आहे़ प्रास्ताविक नागसेन पेंढारकर यांनी केले. सूत्रसंचालन तुषार ठाकरे यांनी तर आभार एन.टी.पाटील यांनी मानले. या स्पधेर्चे परिक्षण नाटककार रविंद्र लाखे, नाट्यलेखक दत्ता पाटील, नाटककार अजित भगत हे करीत आहेत. यशस्वीतेसाठी जिभाऊ करंडक आयोजन समितीचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत़दिवसभरात स्नेहयात्री प्रतिष्ठान (भुसावळ) यांच्याकडून ‘वारी जावा’, मॅड स्टुडीओ (धुळे)-रात्र वैराची आहे, जनायक थिएटर्स (जळगांव)- करंट छबी, समर्थ बहुउद्देशीय संस्था (एरंडोल)- लाल चिखल, प्रताप महाविद्यालय (अमळनेर) असणं-नसणं, सिद्धांत बहुउद्देशीय संस्था (धुळे)- नेकी, लोकमंगल कलाविष्कार (धुळे)-कात, नूतन मराठा महाविद्यालय (जळगांव)-हलगी सम्राट या एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले़ शनिवारी १० एकांकिाकांचे सादरीकरण होणार आहे़ एकुण दहा एकांकीकेचे सादरीकरण होणार आहे. स्पर्धेत एकूण २१ संघांनी सहभाग नोंदवला असून त्यांच्याकडून सादर होणार कलाकृती पाहण्यासाठी पे्रक्षक गर्दी करत आहेत़