शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
8
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
9
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
10
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
11
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
12
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
13
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
14
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
15
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
16
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
17
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
18
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
19
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
20
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?

धर्माच्या भिंती तोडत इम्रान बनला देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 12:56 IST

प्रकाशा बालिका अपहरण : सुरत येथे मुली सापडल्या सुखरूप, आरोपीही जेरबंद

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 28 : एकीकडे जाती-धर्माचे अवडंबर माजविले जात आहे. त्यातून काही समाजकंटक आपले राजकारण करून पोळी शेकत आहेत. परंतु दुसरीकडे जात-धर्माच्या पलीकडे मानवता आजही कायम असल्याचे उदाहरण प्रकाशा येथील बालिकांच्या अपहरण प्रकरणातून दिसून आले. प्रतिकाशी असलेल्या प्रकाशातून बेपत्ता झालेल्या बालिका सुरत येथील दग्र्याच्या माध्यमातून सापडतात, हा योगायोग घडला तो इम्रान नामक व्यक्तीमुळे. दरम्यान, दोन्ही बालिका सुखरूप सापडल्याने कुटुंबासह पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला. प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर परिसरात झोपडीत राहणारा संपाराम मोजा ठाकरे याच्या वंदना (वय 11 वर्ष) व योगिता (वय 8 वर्ष) या दोन्ही मुली आठवडाभरापूर्वी घरातून बेपत्ता झाल्या होत्या. मुलींचा ठिकठिकाणी शोध घेऊनही त्या सापडल्या नसल्यामुळे संपाराम यांनी शहादा पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दगा महाराज गोशाळेत काम करणारा बबन भीमा पावरा याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. नंदुरबार रस्त्यावर पुलाचे काम करणा:या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे:यातदेखील तो मुलींना घेऊन जात असताना दिसून आला होता. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. पोलिसांनी दोन्ही मुलींचे छायाचित्र आणि बबन पावरा याचेही छायाचित्र प्रसिद्ध केले होते. बबनचे मोबाइल लोकेशन देणा:यास पाच हजार, तर त्यांची माहिती देणा:यास दहा हजार रुपयांचे बक्षीसही जिल्हा पोलिसांनी जाहीर केले होते. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. मीडियातील बातम्या, सामाजिक दबाव यामुळे पोलिसांवरही तपासाचे दडपण दिवसेंदिवस वाढतच होते. सुरतकडे रवानाबबन याने मुलींचे अपहरण करून त्यांना नंदुरबार येथे नेले. तेथून त्याने रेल्वेद्वारे सुरत येथे नेल्याची माहिती मिळाली. सुरत येथे तो मुलींचे काय करणार होता याबाबत माहिती नाही. परंतु चार ते पाच दिवसांपासून तो सुरत येथेच विविध ठिकाणी वास्तव्यास होता हे जवळपास स्पष्ट झाले आहे.दग्र्यातील इम्रान झाला देवदूतइस्लाम धर्मात रमजान महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या काळात जास्तीत जास्त चांगले काम करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. दिवसभर रोजा करून पाच वेळा नमाज पठण करून धार्मिकता पाळली जाते. याच पवित्र रमजान महिन्यात           सुरत येथील ओसांबा परिसरातील दग्र्यातील इम्रान सहा हे संपाराम           ठाकरे यांच्या परिवारासाठी देवदूत म्हणून पुढे आले. बबन ठाकरे हा मुलींना घेऊन ओसांबा परिसरात  फिरत असताना त्यापैकी योगिता या मुलीला शौचासाठी तो घेऊन गेला. दुस:या अर्थात वंदना हिला त्याने दग्र्याजवळ थांबविले. तेथे ती रडत होती. तिला रडताना पाहून दग्र्यातील इम्रान सहा हे तेथे आले. त्यांनी वंदनाला विश्वासात घेऊन रडण्याचे कारण विचारले. तिने आई-बाबांकडे जायचे असल्याचे सांगितले. शिवाय भूकदेखील लागल्याचे तिने सांगितले. इम्रान यांनी मुलीला पत्ता विचारला, परंतु केवळ प्रकाशा एवढेच तिला सांगता आले. त्यांच्याजवळील मोबाइल देऊन तिच्या वडिलांचा मोबाइल नंबर लावायला सांगितला. तो तिने बरोबर लावला. इकडे संपाराम यांनी फोन उचलताच योगिता हिने रडत आपल्याला घेण्यास या म्हणून सांगितले. मुलीचे बोलणे झाल्यानंतर तिला याबाबत बबन याला काहीच न सांगण्याचे सांगितले. दुसरीकडे बबन हा योगिताला घेऊन आल्यावर इम्रान यांनी तिघांना पोट भरून जेवण देत थांबण्याचा सल्ला दिला. तिघे तेथे थांबला आणि अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला.