शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व लायब्ररी तातडीने सुरू कराव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 11:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रत्येक आश्रम शाळेच्या आवारात तात्पुरते शेड उभारून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी व अभ्यासिका सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रत्येक आश्रम शाळेच्या आवारात तात्पुरते शेड उभारून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी व अभ्यासिका सुरू करावी अशा सुचना आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी बैठकीत दिल्या.एकात्मिक आदिवासी विकास विभाग, नंदुरबार व तळोदा कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांचा आढावा आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी यांनी मंगळवारी सायंकाळी घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड. सिमा वळवी, प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, माजी मंत्री अ‍ॅड. पद्माकर वळवी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी एन. बी. साबळे, प्रदीप देसाई आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यानी प्रामुख्याने शिक्षण विभागाचा आढावा घेतला. ते म्हणाले, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांच्या आहारात पालेभाज्या फळे योग्य प्रमाणात देण्यात यावे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा यासाठी प्रत्येक शाळेच्या आवारात तात्पुरते शेड उभारुन त्वरीत लायब्ररी सुरु करावी, शिवाय त्या ठिकाणी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा अशा सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी संबंधितांना दिल्या.सहाय्यक प्रकल्प अधिकारी एन.बी.साबळे यांनी शिक्षण विभागाची व देसाई यांनी विकासाच्या योजनांची माहिती यावेळी पालकमंत्र्यांना दिली. आढावा बैठकीत नंदुरबार व तळोदा प्रकल्प कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.