नवापूर तालुक्यातून अवैध लाकूड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 11:37 IST2020-01-02T11:37:16+5:302020-01-02T11:37:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील जामतलाव येथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून अडीच लाख रुपये किमतीचे खैर प्रजातीचा ...

नवापूर तालुक्यातून अवैध लाकूड जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील जामतलाव येथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून अडीच लाख रुपये किमतीचे खैर प्रजातीचा अवैध लाकुड जप्त केले आहे़ या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नंदुरबारचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे व नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांनी मिळालेल्या महितीवरुन वन कर्मचाऱ्यांच्या पथकासोबत जावून जामतलाव येथे पाहणी केली होती़ खाजगी मालकीच्या या जागेवार त्यांना खैर प्रजातीचे संपुर्ण साल काढलेला अंदाजे दोन लाख ५० हजार रुपयांचे लाकूड दिसून आले होते़ वनविभागाच्या पथकाने मुद्देमाल जप्त करुन शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा केले होते़ वनरक्षक जामतलाव यांनी या गुन्ह्या प्रकरणी प्रथम अहवाल जाहीर केला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी परेश सुरेश गावीत रा़जामतलाव व अनिल बामण्या गावीत यांच्याविरोधात गुन्हा नोंद दाखल आहे़ ही कारवाई सहायक वनसंरक्षक जी़आऱ रणदिवे, नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, वनपाल डीक़े़जाधव, वनरक्षक एल़एस़पवार, डी़डी़पाटील, एस.डी.बडगुजर, आरक़े़पावरा, एस़बीग़ायकवाड, एस़पी़पदमोर, के़एऩवसावे, वाहन चालक भगवान साळवे यांच्या पथकाने केली.
खैर, साग, हलगू, सिसम आदी प्रजातीच्या झाडांची चोरटी व अवैध वृक्षतोड होऊन तस्करी करणाºया गुन्हेगारांवर गेल्या वर्षभरात सातत्याने कारवाई करण्यात आली होती़ यातून तालुक्यातून होणारी लाकूड तस्करी कमी करण्यात विभागाला यश आले आहे़ अवैध लाकूड बाळगण्यासह त्याची चोरटी वाहतूक करणाºयांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सहायक वनसंरक्षक जी़आऱ रणदिवे यांनी म्हटले आहे़