शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

राजस्थानमधून उंटांची अवैध वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:26 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : पुष्कर येथुन सोलापूरकडे क्रूरपणे उंटांची वाहतूक करणा:या ट्रकसह चालक व वाहकास नवापूर पोलीसांनी ताब्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : पुष्कर येथुन सोलापूरकडे क्रूरपणे उंटांची वाहतूक करणा:या ट्रकसह चालक व वाहकास नवापूर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आज सकाळी महामार्गावर हा प्रकार घडला. पोलीस सुत्रानुसार,  शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील दोन युवक अक्षित अग्रवाल व नीरव अग्रवाल गुजरात राज्यातील सोनगड येथे मोटरसायकलीने जात असतांना नागपूर-सुरत महामार्गावरील रोकड्या हनुमान मंदिराजवळून धुळ्याकडे जात असलेला ट्रक (क्रमांक आरजे 14 जी एच 9572) त्यांच्या नजरेस पडला. त्यामध्ये 18 उंट दाटीवाटीने भरलेले दिसुन आले. राजस्थान राज्यातील पुष्कर येथुन राज्यातील सोलापूर येथे ट्रकमधुन विना परवाना व दाटीवाटीने उंटाची वाहतूक होत असल्याचे  लक्षात आल्यावर उंटानी भरलेले ट्रक गौरक्षा समितीचे पदाधिकारी अक्षित अग्रवाल, नीरव अग्रवाल, दर्शन पाटील व जितेंद्र अहिरे यांनी महामार्गावर पकडुन पोलीसांना कळविले.  पोलीसांनी ट्रकसह 18 ऊंट ताब्यात घेतले. अधीक चौकशी केली असता ट्रक चालकाकडे वाहतूकीचा परवाना नव्हता. प्राण्यांना क्रुरतेने वागणूक देण्यास प्रतिबंध अधिनियम व मोटरवाहन अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.  जप्त करण्यात आलेल्या 18 उंटांच्या खरेदीच्या  पुष्कर येथील पशुमेळ्यातील पावत्या आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीसांनी ट्रकसह 18 ऊंट ताब्यात घेऊन चालक खालीद मामला, रा. रिठाठ, ता. फिरोजपूर, जिल्हा नुह (हरियाणा) व सलमान फरमान कुरेशी रा. खेतीपूरा मोहल्ला, बागपथ (उत्तर प्रदेश) यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर शिंपी व सहकारी पुढील तपास करीत आहेत.