शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्ती दाखवाल तर लगेच होईल दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचना न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचना न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत़ बेशिस्ती दाखवणाºया नागरिकांना रोख स्वरूपात दंड होणार असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे़जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता तात्काळ नियंत्रण व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना सुरू आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता अधिक आहे़ संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर जाणाºया प्रत्येक नागरिकाने चेहºयावर मास्क परिधान करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतराच्या सुचनेचे पालन करणे आवश्यक आहे. परंतू जिल्ह्यात बºयाच ठिकाणी नागरीक सूचनांचे पालन करतांना आढळून येत नसल्याचे चित्र आहे़ त्यामुळे प्रशासनाने दंडात्मक कारवाईचे आदेश यापूर्वी दिले होते. मात्र नागरिक त्यास दाद देत नसल्याने प्रशासनाने सुधारीत आदेश काढले आहेत़ यातून दंडाच्या रकमेत सुधारणा केली गेली आहे. एखादी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी थुंकताना प्रथम आढळल्यास २०० रूपये दंड होईल़ दुसऱ्यांदा थुंकल्यास ४०० तर तिसºयांदा थुंकल्यास ४०० रूपये दंड आणि फौजदारी कारवाई होणार आहे़ नागरिकांनी मास्क, रुमाल न वापरल्यास प्रथम २०० रूपये दंड केला जाईल़ दुसºयांदा ४०० तर तिसºयांदा आढळल्यास ४०० रूपये दंड आणि फौजदारी कारवाई होणार आहे़सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग न केल्यास प्रथम २०० रूपये दंड होणार आहे़ दुकानमालक, किरकोळ विक्रेते यांना ही दंडाची रक्कम प्रतीग्राहकाप्रमाणे द्यावी लागणार आहे़ दुसºयांदा ४०० आणि तिसºयांदा ४०० रूपये आणि फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे़ आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपालिका, पोलीस आणि महसूल कर्मचारी यांना सूचित करुन पथकांची नियुक्ती झाली आहे़ या पथकांकडून शहरी व ग्रामीण भागात कारवाई सुरू होणार आहे़