रॉकेल नाही तर किमान ‘उज्ज्वला’चा गॅस तरी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 21:34 IST2019-06-19T21:34:34+5:302019-06-19T21:34:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील रेशन कार्डधारकांना गेल्या सहा महिन्यापासून हक्काचे रॉकेल मिळालेले नाही. त्यांना रॉकेल उपलब्ध करून ...

रॉकेल नाही तर किमान ‘उज्ज्वला’चा गॅस तरी द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील रेशन कार्डधारकांना गेल्या सहा महिन्यापासून हक्काचे रॉकेल मिळालेले नाही. त्यांना रॉकेल उपलब्ध करून द्या तसे होत नसेल तर, त्यांना प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्शन द्या, अशी मागणी बेघर संघर्ष समिती ने केली आहे
नंदुरबार शहरात अनेक रेशन कार्डधारक असे आहेत की, त्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे ते आजपयर्ंत गॅस कनेक्शन घेऊ शकले नाही. अशातच जेमतेम प्रति कार्ड एक लिटर रॉकेल त्यांना महिन्यातून एकदा मिळत होते, तेदेखील डिसेंबर 2018 पासून बंद झाले आहे.
जिल्हा प्रशासनाने सदर बाब गंभीरतेने घेऊन ज्या रेशन कार्ड धारकांकडे गॅस जोडणी नाही, अशा लाभाथ्र्यांकडून गॅस जोडणी नसल्याबाबत हमीपत्र भरून घ्यावे आणि त्यांना रॉकेल उपलब्ध करून द्यावे. रॉकेल उपलब्ध होत नसेल तर, त्यांना प्रधानमंत्री उज्जवला योजना अंतर्गत मोफत गॅस कनेक्शन मिळवून द्यावे, अशी मागणी बेघर संघर्ष समितीने जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांना दिलेल्या केलेल्या निवेदनात केली आहे.
अपर जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी निवेदन स्वीकारले. पुढील कार्यवाहीचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देण्यात येत असल्याचे शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले आहे. यावेळी बेघर संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलावरशा कादरशा, चिरागोद्दीन शेख, नगर पालिका शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती एजाज बागवान, अल्पसंख्यांक व हक्क फाऊंडेशनचे सगीर मंसुरी आदी उपस्थित होते. सदर निवेदनाच्या प्रती जिल्हा पुरवठा अधिकारी विजय भांगरे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनाही देण्यात आले.