जयहिंद कॉलनीत मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST2021-01-13T05:21:58+5:302021-01-13T05:21:58+5:30
शहरातील जयहिंद कॉलनीत लोकवर्गणीतून मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात महादेव, माता पार्वती, गणपती, हनुमान, नंदी व कासव मूर्तींची ...

जयहिंद कॉलनीत मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा
शहरातील जयहिंद कॉलनीत लोकवर्गणीतून मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात महादेव, माता पार्वती, गणपती, हनुमान, नंदी व कासव मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मुख्य यजमान अण्णा पवार यांच्यासह विष्णू पाटील, रवींद्र तांबोळी, भूपेश पाटील, प्रकाश कासार यांनी पूजाविधी केला. भागवतकार अविनाश जोशी, अतुल अग्निहोत्री, राजूू जोशी, सचिन इंदोरिया, सुयोग जोशी, यशवंत यांनी पौरोहित्य केले. या कार्यक्रमास दिलीप तांबोळी, नगरसेवक नीलेश पाडवी, माजी नगरसेवक स्वरूप बोरसे, लक्ष्मीकांत भोसले, अनिल वायकर, दत्तात्रय शिंदे, रमेश महाजन, आत्माराम पाटील, चेतन पवार, सदाशिव भंडगर, योगेश दुबे, कल्याण दुबे, वळवी, आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जयहिंद कॉलनीतील नागरिकांनी सहकार्य केले.