शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात लोकसहभागातून उभारले जाणार रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST

सोमवारी आमदार कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपा जिल्हा ...

सोमवारी आमदार कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राजपूत, तालुका अध्यक्ष बळीराम पाडवी, माजी तालुका अध्यक्ष विलास डामरे, स्वीय सहायक वीरसिंग पाडवी, जगदीश परदेशी आदी उपस्थित होते. ६ मे रोजी माझा वाढदिवस असून, वाढदिवसाचे औचित्य साधून तळोदा शहरात कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी लोकसहभागातून एक सुसज्ज कोविड रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या कोविड रुग्णालय उभारणीसाठी तळोदा तालुक्यातील राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था-संघटना यांनी आपले योगदान दिले आहे.

तळोदा शहरात सुरू होणाऱ्या कोविड केंद्रासाठी विविध सामाजिक संघटना व लोकवर्गणीतून कोविड केंद्र उभारण्यात येणार आहे. अशा आपत्तीच्या काळात दात्यांनी पुढे येऊन या कोविड रुग्णालय उभारणीत योगदान देण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

या कोविड रुग्णालयाच्या लोकार्पणप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, माजी मंत्री आमदार जयपाल रावल आदी उपस्थित राहणार याची असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या या कोविड रुग्णालयात गरजू रुग्णांना नि:शुल्क ऑक्सिजन बेड सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर या कोविड रुग्णालयात रुग्णांना विनामोबदला सेवा देणार आहेत. त्याचप्रमाणे तळोद्यातील मेडिकल असोसिएशनकडून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना औषधे उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती देखील आमदार पाडवी यांनी दिली.

६ मे रोजी आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार निधीतून प्राप्त झालेल्या चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले जाणार आहे. तसेच शहरातील हातोडा रस्त्यावर आमदार निधीतून ओपन जिमचे तसेच हातोडा रस्त्यावरच उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज असे नामकरण असणाऱ्या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन केले जाणार आहे.

दरम्यान, ६ मेपासून शहादा व तळोदा येथे आमदार कार्यालयात मतदार संघात रोज सायंकाळी कोविड रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या लक्षणे व औषधोपचाराच्या पाठपुरावासाठी दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन व्यक्ती २४ तास उपलब्ध राहणार असल्याची व्यवस्था आमदारांकडून केली जाणार आहे. ते रोजचा कोविड अहवाल आल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांशी संपर्क करून त्यांना होणाऱ्या त्रासाची महिती घेऊन त्यांना औषधोपचार उपलब्ध करून व आवश्यक त्या सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देणार आहेत. ग्रामीण भागात लोकांच्या मनातील लसीकरणाची भीती व कोरोना बाबतची भीती घालविण्यासाठी युवकांनी जनजागृतीसाठी पुढे येण्याचे व वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारची भेटवस्तू न देता तो कोविड रुग्णालयाला मदत करण्याचे आवाहन आमदार पाडवी यांनी केले.