Horse market turnover of Rs | घोडे बाजारात ८७ लाखाची उलाढाल
घोडे बाजारात ८७ लाखाची उलाढाल


लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : एकमुखी दत्ताच्या यात्रेनिमित्त सारंगखेडा ता.शहादा येथे भरलेल्या घोडेबाजारात यात्रेच्या तिसऱ्या दिवसापर्यंत ८६ लाख ८२ हजाराची उलाढाल उलाढाल झाली आहे. दत्ताच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक विविध उपक्रमांचा आनंद घेत आहे.
महिनाभर चालणाºया सारंगखेडा यात्रेत एकमुखी दत्त मंदिरातील विविध कार्यक्रमांसह चेतक फेस्टीवलला सुरुवात झाली आहे. हे फेस्टीव्हलच्या मंचावर विविध कार्यक्रम सादर केले जात असून ते भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे ठरत आहे. त्यामुळे भाविकांकडून या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद लाभत आहे. घोडेबाजार भाविकांच्या गर्दीने फुलले असून अश्वांची रंगीत तालीम सुरू आहे. याशिवाय विविध प्रकारचे पाळणे, तमाशा मंडळे याद्वारे भाविकांना मनोरंजनाची मेजवानी दिली जात आहे. सादर होणाºया अश्व नृत्यातून यात्रेत नवचैतन्य निर्माण झाले आहे. या यात्रेत शेतकऱ्यांसाठीही प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदशनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंग रावल यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, उपविभागीय कृषी अधिकारी व्ही.बी.जोशी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. प्रदर्शनात शेतकºयांना नेहमीच लागणारे अवजारे, आधुनिक तंत्रज्ञानाधारित साहित्य, विविध प्रकारचे वाण यांचे स्टॉल लावण्यात आले असून शेतकºयांना एकाच छताखाली सर्व माहिती मिळत आहे.


४एकूण घोड्यांची आवक २०००
४बुधवारी ६४ घोड्यांची विक्री (उलाढाल-२१ लाख ८७ हजार २०० )
४आजपर्यंत २६३ घोड्यांची विक्री (उलाढाल- ८६ लाख ८२हजार ४००)
४आजपर्यंत तीन लाख १४ हजाराचा सर्वाधिक महाग घोडा विकला गेला.

Web Title: Horse market turnover of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.