शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

चेतक फेस्टीवलमधील अश्व स्पर्धा ठरताहेत अश्वशौकीनांसाठी पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेनिमित्त येथे सुरू असलेल्या चेतक फेस्टीवलमध्ये विविध अश्व स्पर्धा सुरू आहेत. या ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेनिमित्त येथे सुरू असलेल्या चेतक फेस्टीवलमध्ये विविध अश्व स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धा म्हणजे अश्वशौकीनांसाठी आनंदाची पर्वणी ठरत असून काठीयावाडी जातीच्या अश्वांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.येथील घोडेबाजारात भेट देण्यासाठी देशातील विविध प्रांतातून अश्वशौकीन दाखल झाले आहेत. चेतक फेस्टीवलमध्ये विविध अश्वस्पर्धा सुरू असून काठीयावाडी जातीच्या घोड्यांच्या अदंत नर-मादी सामूहिक गटात ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यात दिव्यराजसिंह चुडासमा (भाडीयाड) यांच्या ‘दिलजित’ घोड्याने प्रथम क्रमांक पटकावला. महावीरसिंग गोयल (भावनगर) यांची ‘पोहर’ घोडी द्वितीय तर विशामन बापू (पडीयाद) यांच्या ‘हरनिया’ घोडीने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या घोड्यांच्या मालकांसाठी अनुक्रमे ५१, ३१ व २१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरुप होते. दोन दात मादी व नर या सामूहिक गटात ३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यात दिग्वीजयसिंह राणा (गुजरात) यांचा ‘गोल्डी’ घोडा प्रथम, युवराजसिंह वाला (राजकोट) यांची ‘पद्मिनी’ घोडी द्वितीय तर जयेश अंबालिया (गुजरात) यांच्या ‘श्री’ या अश्वाने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ५१, ३१ व २१ हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.काठीयावाडी मोठा घोडा (नर) गटात ४५ स्पर्धक सहभागी झाले. यात पालीयास येथील विशामन बापू यांचा ‘नवरत्न’ घोडा प्रथम, अडीयाद येथील दिव्यराजसिंह सोलंकी यांचा ‘सावज’ घोडा द्वितीय तर तृतीय क्रमांक सुरेंद्रनगर येथील अजयराज सिंग यांच्या ‘बोलेरो’ या घोड्याने पटकावला. विजेत्या अश्व मालकांना अनुक्रमे ७१, ५१ व ३१ हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर मोठा मादी गटातही ४५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. सुरेंद्रनगर येथील चंद्रसिंग जडेजा यांच्या ‘वीरा’ घोडीने प्रथम, अनिरुद्धभाई (छाछरीया) यांच्या ‘चंद्रीका’ घोडीने द्वितीय तर सुरेंद्रनगर येथील अजयराजसिंह राणा यांच्या ‘ठेल’ घोडीने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या घोडी मालकांना अनुक्रमे ७१, ५१ व ३१ हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.परीक्षक म्हणून मयूूराजसिंह जडेजा, नरेशभाई खच्चर, डॉ.विजय खाहीद यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण समारंभास चेतक फेस्टीवलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, कर्नाटकचे माजी मंत्री एस.एस. मल्लिकार्जुन, यशवर्धनसिंह बना (इंदूर), संजय चहाट, पवनसिंग चावडा, सुखविंदरसिंह सिंधू (भटींदा), अजित नंदाल, प्रणवराजसिंह रावल, रणवीरसिंह रावल, चंद्रपालसिंह रावल आदी उपस्थित होते. गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या अश्व स्पर्धेत विजयी झालेल्या घोडे मालकांना चेतक फेस्टीवलच्या मंचावर सन्मानीत करण्यात आले. स्पर्धेचे नियोजन विनोद तावडे, विवेक वाडीले, अजय पाटील, महेंद्र गिरासे, विलास चौधरी, विशाल आगळे, एकनाथ गिरासे आदींनी केले होते.सारंगखेडा येथील यात्रा व चेतक फेस्टीवलची महती जगभरात पोहोचली असून त्याची प्रचिती शनिवारी पहावयास मिळाली. इटलीतील आयसीसी शहरातील कॅरीस आॅस्कॅन या विदेशी पर्यटकाने शनिवारी यात्रेत व घोडेबाजारात हजेरी लावून फेरफटका मारला. या वेळी विदेशी पर्यटक कॅरीस यांची प्रस्तुत प्रतिनिधीने भेट घेतली असता ते म्हणाले, यु-ट्युब व फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला चेतक फेस्टीवलची मिळाली. त्यावरुन आपण येथे आलो. यात्रेतील संस्कृती, परंपरा, वेगवेगळी थाटलेली दुकाने दृष्य भारतातच पहावयास मिळते, असे सांगितले. यात्रेत व घोडेबाजारात फेरफटका मारून त्यांनी डोक्यावरील टोपी खरेदी करून गोडशेवचाही आस्वाद घेतला. यात्रेत थाटलेल्या दुकानांना भेटी देऊन त्यांनी व्यावसायिकांची मने जिंकली. यात्रेत फिरुन एकमुखी दत्तप्रभूंचे दर्शन घेणार असल्याचे सांगून आपण व्यावसायिक व उत्तम शेतकरी असून आपल्याकडे चार घोडे असल्याचे त्यांनी सांगितले. कॅरीस यांचा मुक्काम येथील टेन्टसिटीत आहे.