आमदार तांबे यांच्या हस्ते कोविड योद्धांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST2021-02-06T04:58:20+5:302021-02-06T04:58:20+5:30

शहादा तालुका व शहरात कोरोनाचा कहर वाढलेला असताना असंख्य रुग्ण कोविड सेंटर व इतर रुग्णालयात उपचार घेत होते, अशा ...

Honor of Kovid Warriors at the hands of MLA Tambe | आमदार तांबे यांच्या हस्ते कोविड योद्धांचा गौरव

आमदार तांबे यांच्या हस्ते कोविड योद्धांचा गौरव

शहादा तालुका व शहरात कोरोनाचा कहर वाढलेला असताना असंख्य रुग्ण कोविड सेंटर व इतर रुग्णालयात उपचार घेत होते, अशा प्रसंगात त्यांना घरगुती जेवण मिळावे म्हणून तापी रेसिडेन्सीतील महिलांनी स्वतः स्वयंपाक करून कोविड रूग्णांना मोफत जेवणाचे डबे पुरवले होते. खऱ्या अर्थाने मानव सेवा करणाऱ्या या माऊलींच्या कार्याची दखल घेऊन आमदार सुधीर तांबे यांनी पटेल रेसिडेन्सीत जाऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी निवृत्त तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. राजेंद्र पेंढारकर, डाॅ.व्ही.आर. पाटील, तापी रेसिडेन्सी सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश साळी, उपाध्यक्ष जगन शिंदे, डाॅ.दर्शन कुलकर्णी, डाॅ.राकेश पाटील, डाॅ.अमोल वैद्य तसेच सोसायटीतील सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश लांबोळे व अमोल शिंदे यांनी केले.

Web Title: Honor of Kovid Warriors at the hands of MLA Tambe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.