घरकाम करणा:या महिलेकडून दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 16:32 IST2018-03-30T16:32:47+5:302018-03-30T16:32:47+5:30

Homeowner: Steal jewelry from this woman | घरकाम करणा:या महिलेकडून दागिन्यांची चोरी

घरकाम करणा:या महिलेकडून दागिन्यांची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सव्वा लाखाचे दागिने लंपास करून त्याची कबुली देऊनही परत न करणा:या घरकाम करणा:या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शहादा येथे ही घटना घडली़  
सविता सुरेश जोशी (62) रा़ महात्मा गांधी नगर, यांच्या घरी कामास असलेल्या देवकाबाई सुनील जसावत रा़ नवीन पोस्ट मागे, शहादा ह्या महिलेने 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास 38 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, 4 ग्रॅम वजनाच्या अंगठय़ा, दीड ग्रॅम वजनाचे पेंडल असा 1 लाख 20 रूपयांचा ऐवज चोरून नेला होता़ ही बाब लक्षात आल्यानंतर सविता जोशी यांनी विचारणा केल्यानंतर चोरी केल्याची कबुली देत दागिने परत करण्याचे देवकाई जसावत यांनी म्हटले होत़े मात्र दोन दिवसात दागिने न आणून दिल्याने महिलेविरोधात सविता जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े 
 

Web Title: Homeowner: Steal jewelry from this woman