गाव दिवाळीत धक्काबुकीच्या वादातून पातोंडा येथे मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 13:26 IST2018-11-25T13:26:24+5:302018-11-25T13:26:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : : पळाशी येथे झालेल्या गाव दिवाळीच्या कार्यक्रमात पातोंडा व राकसवाडा येथील युवकांमध्ये झालेल्या वादातून ...

Hit by the argument of Diwali in village Diwali, at Patonda, | गाव दिवाळीत धक्काबुकीच्या वादातून पातोंडा येथे मारहाण

गाव दिवाळीत धक्काबुकीच्या वादातून पातोंडा येथे मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : : पळाशी येथे झालेल्या गाव दिवाळीच्या कार्यक्रमात पातोंडा व राकसवाडा येथील युवकांमध्ये झालेल्या वादातून पातोंडा येथे मारहाण झाली. जमावाने दोघांना बेदम मारहाण करीत घराचे व तेथे असलेल्या दुचाकीचे नुकसान केले. 
पळाशी, ता.नंदुरबार येथे गाव दिवाळी होती. तेथे पातोंडा व राकसवाडा येथील युवक देखील गेले होते. गर्दीत राकसवाडाच्या युवकांना पातोंडा येथील युवकांनी धक्काबुकी केल्याचा संशय युवकांना होता. त्यावरून त्यांच्यात धूसफूस सुरू होती. 22 रोजी सायंकाळी राकसवाडा येथील युवकांनी पातोंडा येथील युवकांना जाब विचारण्यासाठी पातोंडा गाठले. तेथे त्यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. जितू रमेश नाईक व इतर दोघांना जमावाने बेद मारहाण केली. याशिवाय योगेश पवार यांच्या घराचे व मोटरसायकलीचे देखील नुकसान केले. त्यानंतर जमाव तेथून पसार झाला. जितू रमेश नाईक यांनी फिर्याद दिल्याने अंबू सरपंच, अभिषेक अंबू, आकाश शंकर भिल, अजय भानुदास भिल व इतर दहा ते 15 जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार सामुद्रे करीत आहे.         

Web Title: Hit by the argument of Diwali in village Diwali, at Patonda,