शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाचे काम नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम नोव्हेंबर २०२० पासून सुरू होण्याचे संकेत आहे. राष्ट्रीय ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम नोव्हेंबर २०२० पासून सुरू होण्याचे संकेत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या एकेरीबाजुच्या दुरूस्तीला सुरूवात झाल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.नागपुर-सुरत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी तीन टप्पे करण्यात आले आहेत. राज्याच्या हद्दीवरील बेडकीपाडा ते फागणेपर्यंतचा पहिला टप्पा असून, या अंतरात राष्ट्रीय महामार्गाची चाळण झाली होती. दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून चौपदरीकरण रेंगाळले आहे. वाहनचालक व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने तक्रारी वाढल्या होत्या. महामार्गावर मोठे खड्डे झाल्याने वाहनधारकांचे हाल होत होते. परिणामी इंधन, वेळ व पैशांचीदेखील नासाडी होत होती. अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली होती. कोंडाईबारी घाटात तर महामार्गच नामशेष होण्याच्या मार्गावर आला होता.राष्ट्रीय महामार्गाची दुरूस्ती करण्यासाठी आमदार शिरिष नाईक, नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला होता. सबब महामार्ग दुरूस्तीच्या कामाची निविदा काढण्यात येवून त्यास मंजुरी देण्यात आली. लॉकडाऊन पूर्वी दुरूस्तीच्या कामास झालेली सुरूवात कोरोनामुळे थांबविण्यात आली होती. संचारबंदी नुकतीच उठविल्याने महामार्ग दुरूस्तीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. राज्याच्या सरहद्दीपासून बेडकी येथून ही दुरूस्ती हाती घेण्यात आली आहे. शहरातील देवळफळी पावेतो ही दुरूस्ती झाली आहे.पावसाने उसंत दिल्याने हे काम जोमाने सुरू आहे. दुरुस्ती करतांना डांबराच्या थराचे कारपेट पसरविले जात आहे. डांबराचा वापरही योग्य प्रमाणात होत असल्याने वाहने धावत असल्यावरही रस्त्याची मजबुती दिसून येत आहे. दुरूस्तीच्या पाठोपाठ प्रथमच साईडपट्ट्या तयार होत असल्याने रस्त्याचा वापर करणारे अवाक होत आहेत. आतापावेतो साईडपट्ट्यांचे अस्तित्वच नसल्याने महामार्ग व साईडपट्ट्या यांचा दुरापास्त संबंधच नाही असा समज या महामार्गासाठी रूढ झाला होता. प्रथमच साईडपट्ट्या होत असल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.नवापूर तालुक्यातील बेडकीपाडापासून दहिवेलपर्यंत आणि दहिवेलपासून धुळेपर्यंत अश्या दोन टप्प्यात एकाच वेळी दुरूस्तीचे हे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी महामार्गाची दुरूस्ती होत असल्याने वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान महामार्गाचे रखडलेले प्रत्यक्ष चौपदरीकरणाचे काम दिवाळी दरम्यान सुरू करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली. यासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, मुंबईच्या एका कंपनीला हे काम देण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.