महामार्ग कामाची चौकशी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:27 IST2019-11-21T12:27:49+5:302019-11-21T12:27:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिनोदा : अकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावरील पडलेल्या खड्डय़ांमुळे लहान मोठे अपघात घडत असल्याने स्थानिक सामाजिक कार्यकत्र्यानी व विविध ...

महामार्ग कामाची चौकशी करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
चिनोदा : अकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावरील पडलेल्या खड्डय़ांमुळे लहान मोठे अपघात घडत असल्याने स्थानिक सामाजिक कार्यकत्र्यानी व विविध संघाटनांनी आमदार राजेश पाडवी यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यापासून या महामार्गावर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरूस्ती करण्यासंदर्भात आमदार राजेश पाडवी यांना सांगितले असता त्यांनी तात्काळ याचीदखल घेत संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा अहिरे यांच्याशी संपर्क साधून रस्त्यांची दुर्दशा पाहण्याची सूचना करीत तात्काळ कारवाईचे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या मार्गावरील खड्डे तुर्तास बुजवून वाहतूक सुरळीत करण्यास सांगितले.
या मार्गाच्या दुरुस्तीसंदर्भात निविदा देखील काढली होती. परंतु कोणीही ऑनलाइन निविदा न भरल्याने काम थांबले असून, पुन्हा आठ ते दहा दिवसाच्या आत फेर निविदा काढण्यास सांगितले आहे. आमदार पाडवी संबंधित अधिका:यांच्या संपर्कात असून, यापूर्वी तयार करण्यात आलेल्या रस्त्याची चौकशी करून यात दोषी आढळून येणा:या संबंधित अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांवर सदोष मनुष्य वदाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे पाडवी यांनी सांगितले आहे.
महामार्गावर होत असलेल्या अपघातांमुळे अनेकांना जी गमवावा लागला असल्याचे समोर आले असून, याबाबत मी स्वत: लक्ष घालून या रस्त्याच्या दुरूस्ती संदर्भात संबंधित अधिका:यांशी संपर्कात असून, यापूर्वी झालेल्या कामाची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करणार आहे.
- राजेश पाडवी, आमदार, शहादा-तळोदा