महामार्गावरील वाहतूक चार दिवसात सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:52 IST2019-08-16T12:52:45+5:302019-08-16T12:52:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : रहदारी पूर्णपणे बंद झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील रहदारी येत्या तीन ते चार दिवसात ...

Highway traffic will start in four days | महामार्गावरील वाहतूक चार दिवसात सुरू करणार

महामार्गावरील वाहतूक चार दिवसात सुरू करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : रहदारी पूर्णपणे बंद झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील रहदारी येत्या तीन ते चार दिवसात सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिका:यांनी भेट दिल्यानंतर हा निर्णय जाहीर केला.
गेल्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायंगण शिवारात  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील ब्रिटीश कालीन फरशी तुटल्याने महामार्ग पूर्णत: बंद झाला. ही घटना घडून सहा दिवस झाले असतांना पर्यायी व्यवस्था होत नसल्याचे पाहून चिंचपाडा येथील मनिष ओमप्रकाश अग्रवाल व सहकारी यांनी बुधवारी स्वखर्चाने पुलाचे काम करण्याचा बेत आखला व प्रत्यक्ष कामास सुरूवातही केली. क्षतिग्रस्त पुलाच्या शेजारी असलेल्या जुन्या मार्गालगत पाईप टाकून त्यावर मुरूमाचा भराव करुन लहान तीन व चारचाकी वाहनांची ये जा मंगळवारी सायंकाळ पासून सुरू झाली आहे. बुधवारी दुपारी पुलाच्या उभारणीच्या विचाराने सुरू झालेल्या कामाची चर्चा सोशल मिडीयावर तयार करण्यात आलेल्या एका समुहावर सार्वजनिक करण्यात        आली. 
कामासाठी लोकसहभागाचा पर्याय देण्यात आला. सीमा परिवहन तपासणी नाक्यावरील अधिकारी व काही व्यापारी तथा व्यावसायिकांनी त्यास सहमती दर्शविल्यावर प्रत्यक्ष कामही सुरू झाले. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिका:यांना ही बाब समजल्यावर त्यांनी  सायंकाळी पाच वाजता घटनास्थळी भेट दिली. 
महामार्गावर नवीन पुलाच्या उभारणीसाठी 16 रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असून, येत्या एक महिन्याच्या कालावधीत युध्दस्तरावर पुलाची उभारणी करण्यात येणार आहे, असे महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे, तांत्रिक व्यवस्थापक रवींद्र इंगोले यांनी सांगितले. 16 ऑगस्ट पासून पुलाच्या समांतर मुरूमाचा भराव करून वळण रस्ता उभारून येत्या चार दिवसात महामार्गावरील रहदारी पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाची दुरवस्था झालेली आहे. संबंधित विभागाचे अधिकारी या प्रश्नावर गंभीर नसल्याने दिवसागणिक महामार्गाची दैना होत आहे. पावसाळ्याचेनिमित्त करून महामार्ग दुरुस्ती लांबणीवर टाकली जात आहे. वस्तुस्थितीनुसार गेल्या कित्येक महिन्यांपासून महामार्गावर मोठय़ा खड्डय़ांची दुरूस्ती न करण्यात आल्याने महामार्गाचा वापर करणारे प्रवासी, महामार्गालगत असलेले हॉटेल व इतर व्यावसायिक, पेट्रोल पंप मालक, वाहनधारक हाल अपेष्टा सोसत आहेत. फक्त अधिका:यांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्याचा आरोप होत आहे.  अधिका:यांनी पळून न जाता महामार्गाच्या दुरूस्तीचे काम हाती घ्यावे यासाठी सर्वानी एकत्रित येऊन प्रय} करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, पालकमंत्री व मुख्यमंत्री यांच्या नंदुरबार येथील प्रस्तावित भेटीत हा प्रश्न चर्चीला जावा यासाठी प्रय} होत असतांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिका:यांच्या बुधवारच्या भेटीत ठोस आश्वासन मिळाल्याने काम सुरू होण्याची अपेक्षा वाढीस आली आहे. अधिका:यांनी रायंगण येथून बेडकी पावेतो रस्त्याची पाहणी करून खड्डे दुरूस्तीसाठी नेमके काय व  कसे करावे लागेल याची पाहणी  केली. 
 

Web Title: Highway traffic will start in four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.