मुख्याध्यापकांचे नंदुरबारात राज्य अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 13:22 IST2018-11-04T13:21:55+5:302018-11-04T13:22:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : : मुख्याध्यापक संघाचे 58 वे राज्य अधिवेशन 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान नंदुरबार येथे ...

Headmasters of State in Nandurbar | मुख्याध्यापकांचे नंदुरबारात राज्य अधिवेशन

मुख्याध्यापकांचे नंदुरबारात राज्य अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : : मुख्याध्यापक संघाचे 58 वे राज्य अधिवेशन 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान नंदुरबार येथे सैनिकी विद्यालयात होणार आहे. तीन दिवशीय अधिवेशनात विविध ठराव, चर्चा करण्यात येणार आहे.
राज्य मुख्याध्यापक संघ व जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे अधिवेशन होणार आहे. उद्घाटन 12 रोजी दुपारी दोन वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी हरिश्चंद्र गायकवाड तर उद्घाटन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, यांच्या हस्ते होणार आह़े प्रसंगी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ.हिना गावीत, भारती विद्यापीठाचे आमदार डॉ.विश्वजीत कदम, जि.प.अध्यक्षा रजनी नाईक, आमदार सुरुपसिंग नाईक, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार अॅड.के.सी.पाडवी, आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार उदेसिंग पाडवी, आमदार किशोर दराडे, आमदार शिरीष चौधरी, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, माजी आमदार शरद गावीत, शहादा नगराध्यक्ष मोतिलाल पाटील, नंदुरबारच्या नगराध्यक्षा र}ा रघुवंशी, उपनगराध्यक्षा शोभा मोरे, मनोज रघुवंशी, दीपक पाटील,  गुलाम वस्तानवी आदी उपस्थित राहणार आहेत. 
13 रोजी सकाळी साडेनऊ वाजता शिक्षक भरती पवित्र पोर्टल समस्या आणि उपाय यावर मार्गदर्शन होईल. साडेदहा वाजता गझलकार प्रदीप निफाडकर व निळकंठ गायकवाड यांचे व्याख्यान होईल. अडीच वाजता अध्ययन निष्पत्ती, कृतीपत्रिका- बदलेले मुल्यमापन यावर मार्गदर्शन होईल. दुपारी साडेतीन वाजता पुरस्कार वितरण होईल. खासदार रक्षा खडसे, अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष ज.मो.अभ्यंकर, आमदार विक्रम काळे, आमदार कपील पाटील, जि.प.सदस्य भरत गावीत, माजी मंत्री पद्माकर वळवी, जि.प.सदस्य अभिजीत पाटील, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, आदिवासी कारखान्याचे चेअरमन शिरिष नाईक, नगरसेवक मकरंद पाटील, आमशा पाडवी, रवींद्र चौधरी, यशवंत पाटील उपस्थित राहतील.
14 रोजी सकाळी साडेनऊ वाजता शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव हे ‘शिक्षण व्यवस्थेतील मुख्याध्यापकांची भुमिका’ या विषयावर मार्गदर्शन करतील. यावेळी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम, डॉ.राहुल चौधरी, सुभाष माने उपस्थित राहतील. सकाळी साडेदहा वाजता ‘मुख्याध्यापकांना शालेय प्रशासन चालवतांना येणा:या समस्या’ या विषयावर अॅड.महेंद्र भावसार मार्गदर्शन करतील. अरुण थोरात अध्यक्षस्थानी असतील. सकाळी साडेअकरा वाजता खुले अधिवेशन होईल. 
दुपारी साडेबारा वाजता समारोप होणार असल्याची माहिती अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, संघाचे जिल्हाध्यक्ष मुकेश पाटील, सचिव पुष्पेंद्र रघुवंशी, कार्याध्यक्ष कुंदन पाटील यांनी दिली. सहभागी होण्याचे आवाहन राज्य संघाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड व सचिव आदिनाथ थोरात यांनी केले आहे.

Web Title: Headmasters of State in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.