मोठ्या गाडीसाठी पैसे आणावेत म्हणून छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 11:40 IST2020-01-02T11:40:48+5:302020-01-02T11:40:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील माहेर तर सायने ता़ जि़धुळे येथील माहेर असलेल्या विवाहितेचा माहेरुन मोठी गाडी विकत ...

मोठ्या गाडीसाठी पैसे आणावेत म्हणून छळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील माहेर तर सायने ता़ जि़धुळे येथील माहेर असलेल्या विवाहितेचा माहेरुन मोठी गाडी विकत घेण्यासाठी ५ लाख रुपये आणावेत यासाठी सासरच्यांकडून छळ करण्यात आला़ एप्रिल २०१९ पासून सुरु असलेल्या छळप्रकरणी विवाहितेने फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे़
मालतीबाई कांतीलाल मोरे असे विवाहितेचे नाव आहे़ त्यांचा पती कांतीलाल, सासू येनूबाई, सासरे सिताराम रुपा मोरे, हिरालाल मोरे, पूनम हिरालाल मोरे, पप्पूलाल सिताराम मोरे, कविता पप्पूलाल मोरे यांनी वेळोवेळी शिवीगाळ करुन माहेरुन पाच लाख रुपये आणावेत शारिरिक व मानसिक छळ केला़ याबाबत शहर पोलीस ठाण्यात सर्व सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वळवी करत आहेत़