नवापुरात एक लाख ३७ हजारांचा गुटखा जप्त, एकाविरुद्ध गुन्हा
By मनोज शेलार | Updated: April 26, 2023 19:39 IST2023-04-26T19:38:11+5:302023-04-26T19:39:47+5:30
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखाचा साठा आढळून आला.

नवापुरात एक लाख ३७ हजारांचा गुटखा जप्त, एकाविरुद्ध गुन्हा
नंदुरबार : शहरात एक लाख ३७ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाने ही कारवाई केली. नवापूर शहरातील सरदार चौकात एका दुकानात गुटखा विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागाच्या पथकाने या दुकानाची व त्याला लागून असलेल्या घराची तपासणी केली असता, तेथे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखाचा साठा आढळून आला.
एकूण एक लाख ३७ हजार रुपयांचा गुटखा पथकाने जप्त केला. याप्रकरणी अलीमोहंमद अरीफभाई मुसानी (४०, रा. सरदार चौक, नवापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली. तपास फौजदार मनोज पाटील करीत आहे. ही कारवाई कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी आनंदा भाऊराव पाटील यांनी केली