प्रकाशा गावाजवळ १८ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:28 IST2021-04-12T04:28:12+5:302021-04-12T04:28:12+5:30

नंदुरबार : येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने प्रकाशा ता.शहादा येथे धडक कारवाई करीत १८ लाखांचा गुटखा जप्त केला. प्रकाशा ...

Gutka worth Rs 18 lakh seized near Prakasha village | प्रकाशा गावाजवळ १८ लाखांचा गुटखा जप्त

प्रकाशा गावाजवळ १८ लाखांचा गुटखा जप्त

नंदुरबार : येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने प्रकाशा ता.शहादा येथे धडक कारवाई करीत १८ लाखांचा गुटखा जप्त केला.

प्रकाशा गावाजवळ तळोदा रस्त्यावरील आप्पाच्या ढाब्यानजीक पोलिसांनी सापळा रचला. या ढाब्यावर ट्रॉला (क्रमांक एमपी-०९-एचएफ-८५६३) हा संशयास्पद स्थितीत आलेला होता. पथकाने ट्रॉला व त्याचा सहचालक यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यांनी ट्रॉलामध्ये प्लास्टिकचे दाणे असल्याचे सांगितले. ट्रॉला उघडून पाहिला असता त्यात प्लास्टिकच्या दाण्यांच्या गोण्या दिसत होत्या. तथापि, मिळालेली माहिती खात्रीशीर असल्याने तसेच चालकाची वर्तणूक संशयास्पद होती. तेव्हा त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने प्लास्टिकच्या गोण्याच्या दोन थरांखाली गुटखा असल्याचे मान्य केले. त्यानुसार वाहनातील प्लास्टिकच्या दाण्यांच्या गोण्या उतरवल्या. त्यात १५ लाख ५५ हजार ८४० रुपये किमतीच्या ४० गोण्या गुटखा तसेच दोन लाख ७४ हजार ५६० रुपये किमतीच्या गुटख्यात मिसळण्यासाठीच्या ४० गोण्या आढळल्या.

हा गुटखा गुजरात राज्यातील वापी येील कृष्णा तंबाकू ट्रेडर्स येथून भरला असून, तो मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील नवीन ट्रेडर्समध्ये नेण्यात येत होता. या गुटख्याला महाराष्ट्रात बंदी आहे. याप्रकरणी साबीर शेख गब्बू शेख (वय ४०), इरफानखान इकबालखान (वय २२) (दोन्ही रा.भौरांसा, ता.सोनखच, जि.देवास, मध्य प्रदेश), वापी येथील कृष्णा ट्रेडर्स मालक व मध्य प्रदेशातील नवीन ट्रेडर्सचे मालक अशा चार जणांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी पो.हे.काँ. मुकेश तावडे, बापू बागुल, राजेंद्र काटके यांच्या पथकाने १० रोजी ही कारवाई केली.

Web Title: Gutka worth Rs 18 lakh seized near Prakasha village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.