सुतारे येथे शेतीशाळेत महिलांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 12:16 IST2020-10-31T12:16:31+5:302020-10-31T12:16:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टे : तालुक्यातील सुतारे येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत नोंदणीकृत महिला शेतकरी गटातील महिलांची ...

Guidance to women in farming at carpentry | सुतारे येथे शेतीशाळेत महिलांना मार्गदर्शन

सुतारे येथे शेतीशाळेत महिलांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टे : तालुक्यातील सुतारे येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत नोंदणीकृत महिला शेतकरी गटातील महिलांची शेतीशाळा घेण्यात आली.
‘आत्मा’चे संचालक तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे व  उपसंचालक तथा उपविभागीय कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ही शेतीशाळा घेण्यात आली. शेती शाळेच्या माध्यमातून देण्यात येणारे तंत्रज्ञान व विस्तार शिक्षण खऱ्‍या अर्थाने यशस्वी होण्यासाठी शेती व्यवस्थापन व विक्री व्यवस्थापनामध्ये महिलांचा सहभाग व्हावा यासाठी महिला शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महिला शेतकरी गटाच्या सदस्यांना सुरुवातीस आत्मा पीक प्रात्यक्षिक दरम्यान हरभरा बियाण्याचे तालुका कृषी आर.एम. पवार, पं.स. सदस्य संतोष साबळे, सरपंच दिलीप पवार, मंडळ कृषी अधिकारी आर.सी. हिरे, कृषी पर्यवेक्षक एस.एन. पाटोळे, कृषी सहायक शशिकांत गावीत व ग्रामपंचायत   सदस्य यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
शेतीशाळेच्या पहिल्या वर्गात कृषी पर्यवेक्षक संदीप पाटोळे यांनी शेतीशाळेविषयी माहिती देऊन हरभरा पिकाची जमिनीनुसार वाण निवड, पेरणी अंतर, पेरणीची योग्य तारीख व बीबीएफ मशीनने पेरणी केल्यास होणारे फायदे याविषयी माहिती देऊन महिला शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक चंद्रकांत बागुल यांनी बीज प्रक्रियेचे फायदे व महत्व याविषयी माहिती देताना बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले. शेतीशाळेच्या नियोजनात कृषी सहाय्यक शशिकांत गावीत यांना चैतन्य संस्था नंदुरबारच्या जिल्हा समन्वयक मोहिनी पाटील व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मदत केली. आभार चैतन्य संस्थेच्या योगिता वाघ यांनी मानले.

Web Title: Guidance to women in farming at carpentry