शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

आरोग्याच्या निधीवरून पालकमंत्री संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 12:41 IST

जिल्हा नियोजन समिती सभा : क्रिडा अकॅडमीला चालना देणार

नंदुरबार : जिल्हा नियोजन व विकास मंडळाने जिल्हा परिषद आरोग्य विभागाला दिलेल्या 40 कोटीच्या विगतवारीवरून पालकमंत्री चांगलेच भडकले. महिनाभरात आरोग्याच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चित्र दिसले नाही तर जिल्हा आरोग्य अधिका:यांना तडकाफडकी निलंबीत करण्याचा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला. दरम्यान, बैठकीत जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, आमदार सुरुपसिंग नाईक, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहासन नाईक, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्यासह प्रमुख अधिकारी व सदस्य उपस्थित होते.जिल्हा नियोजन व विकास समितीने जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातील 35 कोटी रुपयांचा निधी आरोग्य केंद्र बांधकामासाठी आहेत. हा विषय बैठकीत निघाल्यावर जिल्हा आरोग्य अधिका:यांनी निधीच्या खर्चाची विगतवारी देण्याचा प्रय} केला. परंतु पालकमंत्र्यांचे त्यावर समाधान न झाल्याने त्यांनी आरोग्य विभागाने कामकाजात सुधारणा करण्याच्या सुचना दिल्या. डीपीडीसीने जर निधी मंजुर केला आहे तर खर्चासंदर्भात मुंबईला प्रस्ताव पाठविण्याची गरज काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. बांधकामांची स्थिती अतिशय संथ असल्याचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात येत्या महिनाभरात कामात सुधारणा न झाल्यास जिल्हा आरोग्य अधिका:यांना निलंबीत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले. बैठकीत इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.विविध विषयांवर चर्चाबैठकीत झालेल्या विविध विषयांवरील चर्चेनंतर बोलतांना पालकमंत्री रावल म्हणाले, शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात 27 हजार शेतक:यांना 105 कोटी 68 लाख रुपयांचा लाभ देवून शेतक:यांचा सातबारा कोरा केला आहे. बोंडअळीग्रस्त शेतक:यांना आतार्पयत 90 कोटी रुपयांचे वाटप दोन टप्प्यात करण्यात आले आहे. उर्वरित रक्कम देखील लवकरच दिली जाणार आहे. आदिवासी लाभाथ्र्याना विविध योजनांच्या लाभासाठी वारंवार फे:या माराव्या लागू नयेत यासाठी संबधित विभागाने योग्य नियोजन करावे.नंदुरबारात क्रिडा अकॅडमी स्थापन करण्यासाठी प्रय} असून यातून आदिवासी विद्याथ्र्याना क्रिडा शिक्षणाचे योग्य मार्गदर्शन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील पडीत किल्ले, गढी यांची दुरूस्ती करण्यासाठी व होळी महोत्सवाला चालना देण्यासाठी नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी आदिवासी आश्रम शाळेतील मुलींना ते राहत असलेल्या ठिकाणीच जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली. आमदार उदेसिंग पाडवी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी वितरण करतांना समितीने आमदार, लोकप्रतिनिधी व नियोजन समितीचे सदस्य यांना विश्वासात घेवून विभागांना निधी वितरीत करावा अशी मागणी केली.जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी नियोजन समितीच्या माध्यमातून झालेल्या खर्चाविषयी माहिती दिली. सूत्रसंचलन जिल्हा नियोजन अधिकारी उन्मेश सूर्यवंशी यांनी केले.