राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री बुधवारी नंदुरबारात

By मनोज शेलार | Updated: November 13, 2023 18:22 IST2023-11-13T18:20:04+5:302023-11-13T18:22:26+5:30

तीन दिवशीय महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी राज्यपाल बैस व मुख्यमंत्री शिंदे हे नंदुरबारमध्ये एका कार्यक्रमानिमित्त थांबणार आहेत.

Governor Ramesh Bais and Chief Minister in Nandurbar on Wednesday nandurbar | राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री बुधवारी नंदुरबारात

राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री बुधवारी नंदुरबारात

नंदुरबार : आदिवासी विकास विभागातर्फे १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित जनजातीय गौरव दिवस व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनासाठी राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी नंदुरबारात येत आहेत. तीन दिवशीय महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित, पालकमंत्री अनिल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सकाळी ११ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. राज्यपाल बैस व मुख्यमंत्री शिंदे हे एकाच शासकीय हेलिकॉप्टरने येणार असून तीन तास नंदुरवबारात कार्यक्रमानिमित्त थांबणार आहेत. कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत. तीन दिवशीय महोत्सवात राज्यभरातील सांस्कृतिक व कला पथके नंदुरबारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

Web Title: Governor Ramesh Bais and Chief Minister in Nandurbar on Wednesday nandurbar