शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना लसीकरण शिबिरांना चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST

तळोदा येथील शेठ के. डी. हायस्कूल येथील कोरोना लसीकरण शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी यांच्या हस्ते करण्यात ...

तळोदा येथील शेठ के. डी. हायस्कूल येथील कोरोना लसीकरण शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात २३० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी तहसीलदार गिरीश वखारे, गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर यांनी नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले. नोंदणी केलेल्या नागरिकांचे मोहीमस्तरावर लसीकरण करण्यात आले. मोड येथेदेखील सीमा वळवी यांच्या उपस्थितीत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी राहुल चौधरी उपस्थित होते.

नंदुरबार तालुक्यात १९०४ नागरिकांचे लसीकरण

नंदुरबार तालुक्यात लसीकरण मोहिमेने चांगला वेग घेतला असून, सोमवारी दिवसभरात एक हजार ९०४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. चार फिरत्या पथकांद्वारे ग्रामीण भागातील लसीकरण करण्यात आले. नगाव येथे १०७, जुनमोहिदा ११०, हाटमोहिदा ४३, वैदाणे २०४ आणि नंदुरबार शहरात ९५७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

शहादा तालुक्यातही लसीकरण मोहीम

शहादा तालुक्यातदेखील लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक ग्रामीण भागात जनजागृतीसोबत नोंदणीचे कामदेखील करीत आहेत. त्यामुळे लसीकरणाला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. तऱ्हाडी येथे १२३, लोणखेडा ११० आणि लक्कडकोट व अंबापूर येथील ९८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

धडगाव तालुक्यात लसीकरणासोबत आरोग्य तपासणी

धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातही फिरत्या पथकाद्वारे लसीकरण करण्यात येत आहे. येथे होत असलेल्या जनजागृतीमुळे नागरिक लसीकरण नोंदणीसाठी पुढे येत आहेत. नागरिकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी शिक्षकांसोबत तलाठी, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधीदेखील प्रयत्न करीत आहेत. मुंदलवड गावात तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व सांगितले. यावेळी वेगवेगळ्या पाड्यांवरील कारभारी उपस्थित होते. गावातील ५४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण शिबिरासाठी सरपंच सुनीता वळवी, उपसरपंच विनोद वळवी, ग्रामपंचायत सदस्या योगिता वळवी यांचे सहकार्य मिळाले. तालुक्यातील आचपा, पिंपरी येथे लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली. नागरिकांची भेट घेऊन त्यांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. खामला येथे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत नागरिकांचे तापमान व ऑक्सिजन पातळी तपासणी करण्यात आली.