प्रेमविवाहाच्या रागातून बापाने केला मुलीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 12:19 IST2018-04-06T12:19:10+5:302018-04-06T12:19:10+5:30

The girl's murder made her father angry | प्रेमविवाहाच्या रागातून बापाने केला मुलीचा खून

प्रेमविवाहाच्या रागातून बापाने केला मुलीचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
खेतिया : प्रेम विवाह केलेल्या मुलीवर बापाने कोयत्याने वार करून जागीच ठार केल्याची घटना खेतिया येथे गुरुवारी सकाळी घडली. मुलीच्या आई-वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
खेतिया येथील देविदास मानका मगर यांची मुलगी सरला हीने वर्षभरापूर्वी पानसेमल येथील पंकज भटू माळी या युवकाशी पुणे येथे पळून जावून प्रेमविवाह केला होता. त्यानंतर दोघे मुंबई येथे राहत होते. दोन दिवसांपूर्वी ते पानसेमल येथे आल्याची माहिती देविदास मगर यांना मिळाली. त्यांनी पानसेमलला जावून आईची तब्येत बरी नसल्याचे सांगून घरी येण्याची सांगितले. त्यानुसार गुरुवारी सकाळी सरला व तिचा पती पंकज हे खेतिया येथे गेले. घरात घुसताच आईने मुलीवर लाकडे दांडक्याने प्रहार केला. दोघेजण तेथून पळाले असता वडिल देविदास यांनी कोयत्याने मुलीवर वार केला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. पंकज हा पळत पोलीस ठाण्यात गेला. त्याने पोलिसांना माहिती देताच डीवायएसपी पद्मसिंग वाघेले, निरिक्षक राजेंद्र इंगळे, के.एल.पाटीदार हे घटनास्थळी पोहचली. खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीच्या आई-वडिलांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: The girl's murder made her father angry