बिबट्याच्या हल्ल्यात बालिका जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 12:12 IST2021-01-12T12:12:03+5:302021-01-12T12:12:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील वाल्हेरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय बालिका गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी ...

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यातील वाल्हेरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय बालिका गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
रोविता सामा वळवी (६) असे बालिकेचे नाव आहे. ती मूळची डोंगरीपाडा, ता. अक्कलकुवा येथील रहिवासी आहे. रोविता ही दोन दिवसांपूर्वीच वाल्हेरी येथे नातेवाइकांकडे आली होती. यादरम्यान तिच्यावर सोमवारी सकाळी बिबट्याने हल्ला करत जखमी केले. याच काळात तहसीलदार गिरीश वाखारे हे या भागात निवडणूक कामकाजानिमित्त आले होते. त्यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोग्य विभागाला सूचना देत बालिकेला तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.
या ठिकाणी उपचार सुरू असताना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. बालिकेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, तळोदा तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. सद्या रब्बी पीक शेतात बहरले असल्यामुळे बिबट्यांचा वावर अशा भागात वाढला असल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.