नंदुरबारमध्ये एसटी बसच्या धडकेत बालिका जखमी
By मनोज शेलार | Updated: April 3, 2023 17:34 IST2023-04-03T17:33:35+5:302023-04-03T17:34:37+5:30
बस चालकाविरुद्ध म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबारमध्ये एसटी बसच्या धडकेत बालिका जखमी
नंदुरबार : भरधाव एसटी बसने धडक दिल्याने १२ वर्षीय बालिका जखमी झाल्याची घटना शहादा-म्हसावद रस्त्यावर राणीपूर फाट्यानजीक घडली. याबाबत बस चालकाविरुद्ध म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, शहादा- म्हसावद रस्त्यावरील राणीपूर फाट्यानजीक रोशनी दारसिंग पावरा (१२) रा. तलावडी, ता. शहादा ही बालिका उभी होती. त्यावेळी आलेल्या एसटी बसने (क्रमांक एमएच १४ बीटी १३२१) बालिकेला धडक दिली. त्यात ती जखमी झाली. याबाबत श्रावण देवा पावरा यांनी फिर्याद दिल्याने बसचालक जितेंद्र हिरामन सूर्यवंशी (४१) रा.बाळापूर-फागणे, ता. धुळे यांच्याविरुद्ध म्हसावद पोलिसात अपघातान्वये नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार सुनील बागूल करीत आहे.