धडगाव तालुक्यातील देवरापाडा येथे आईलाच ठरविले मुलाने डाकीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:34 IST2019-03-30T12:34:28+5:302019-03-30T12:34:52+5:30

भावावर चाकू हल्ला : पत्नी आजारी पडत असल्याचे कारण

The girl decided to have a mother in Deorapada in Dhadgaon taluka | धडगाव तालुक्यातील देवरापाडा येथे आईलाच ठरविले मुलाने डाकीण

धडगाव तालुक्यातील देवरापाडा येथे आईलाच ठरविले मुलाने डाकीण

नंदुरबार : आपली आई डाकीण असून तीने तंत्रमंत्र करून पत्नीला आजारी पाडले असा आरोप केल्याने झालेल्या वादावादीत मोठ्या भावाने लहान भावावर चाकू हल्ला केल्याची घटना मांडवीखुर्दचा देवरापाडा, ता.धडगाव येथे घडली.
मांगा काळशा वसावे रा.अक्राणी असे संशयीत मुलाचे नाव आहे. मांगा वळवी याची पत्नी नेहमीच आजारी राहते. त्याला कारण आपली आई आहे. ती डाकीण असून तंत्रमंत्र करते. पत्नीला जर बरे केले नाही तर आई-वडिलांना आणि भावाला जीवंत सोडणार नाही असा दम मांगा याने लहान भाऊ वसंत वसावे याला भरला. त्यावरून दोन्ही भावांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. मांगा याने चाकूने वसंत याच्यावर वार केले. त्यात त्यांच्या हाताच्या बोटाला, कानाला जखम झाली.
याबाबत वसंत काळशा वसावे याने दिलेल्या फिर्यादीवरून मांगा काळशा वसावे याच्याविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार काझी करीत आहे.

Web Title: The girl decided to have a mother in Deorapada in Dhadgaon taluka