शहरं
Join us  
Trending Stories
1
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
2
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
3
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
4
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
5
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
6
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
7
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
8
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
9
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
10
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
11
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
12
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
13
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
14
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
15
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
16
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
17
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
18
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
19
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
20
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...

महाकाय ‘सरदार’ची पातळी यंदा प्रथमच शिखरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 11:57 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाकाय सरदार सरोवर प्रकल्पाची उंची पुर्ण झाल्यानंतर या वर्षी प्रथमच या ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाकाय सरदार सरोवर प्रकल्पाची उंची पुर्ण झाल्यानंतर या वर्षी प्रथमच या प्रकल्पात सर्वाधिक म्हणजे 132 मिटर्पयत पाण्याची पातळी गेली आहे. दरम्यान, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील पुनर्वसन बाकी असल्याने या पाण्यामुळे अनेक घरे बुडीताखाली येत असल्याने प्रकल्पात पाणीसाठा कमी ठेवण्याचा निर्णय घ्यावा या आशयाचे पत्र नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. या पाण्यामुळे सध्या नंदुरबार जिल्ह्यातील बामणी गावातील चार घरांमध्ये पाणी शिरले आहे.सरदार सरोवर प्रकल्पाची उंची, त्यामुळे निर्माण झालेल्या पुनर्वसनाचा प्रश्न, पर्यावरणाचा प्रश्न या बाबीमुळे गेल्या पाच दशकांपासून हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आहे. पुनर्वसनाबाबत नर्मदा बचाव आंदोलनाच्या तक्रारी असतांना या प्रकल्पाची 138.68 मिटर्पयतच्या उंचीचे काम दोन वर्षापूर्वीच झाले आहे. तथापी प्रकल्पाचे काम पुर्ण झाल्यानंतर गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्याने या प्रकल्पात जेमतेम 120 मिटर्पयत पाणीसाठा झाला होता. प्रकल्पाचे काम सुरू असतांनाही गेल्या 20 वर्षात नर्मदेला आलेल्या पुरांमुळे या ठिकाणी पाण्याची पातळी 127 व 129  मिटर्पयत यापूर्वी पोहचली होती. प्रकल्पाचे पुर्ण बांधकाम झाल्यानंतर यावर्षी प्रथमच या प्रकल्पात 132 मिटर्पयत पाण्याची पातळी गेली आहे. जी आजवर सर्वोच्च पातळी आहे. गेल्या आठवडय़ात मध्यप्रदेशातील धरणांमधून पाणी सोडल्याने या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. परंतु पुन्हा पाण्याची पातळी नियंत्रीत करण्याची कार्यवाही होत आहे. सध्याच्या पाण्याच्या पातळीमुळे मध्यप्रदेशातील काही गावांमध्ये पुर स्थिती आहे. महाराष्ट्रातीलही काही कुटूंब अजून नर्मदा काठावरच वास्तव्यास असल्याने बामणी, ता.अक्कलकुवा येथील चार घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच काही घरांना टापू स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याची पातळी अजून वाढली तर अनेकांची घरे बुडीताखाली येणार असून जिवीत व वित्तीय हानीचाही धोका आहे. या पाश्र्वभुमीवर नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून नर्मदेचे पुनर्वसन बाकी असतांना धरणात पुर्ण क्षमतेने पाणीसाठा करणे म्हणजे बाधीतांवर अन्याय कारक आहे. यापूर्वीच नर्मदा प्राधिकरणाने पुनर्वसनाबाबतचे निर्णय स्पष्ट केल्यानंतरही त्यानुसार काम झालेले नाही.  बाधीतांच्या आयुष्याशी हा खेळ सुरू आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे संवेदनशीलपणे पाहून बाधीतांचे प्रश्न सोडवावे व पुनर्वसन होईर्पयत सरदार सरोवर प्रकल्पात 122 ते 127 मिटर्पयतच पाणीसाठा करावा.