नवापुर तालुक्यातून गावीत दाम्पत्य विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 14:07 IST2020-01-08T14:05:21+5:302020-01-08T14:07:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्याच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते़ यातील रायंगण आणि करंजी या दोन ...

Gavit couple won from Navapur taluka | नवापुर तालुक्यातून गावीत दाम्पत्य विजयी

नवापुर तालुक्यातून गावीत दाम्पत्य विजयी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर तालुक्याच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते़ यातील रायंगण आणि करंजी या दोन गटात माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत यांचे पुत्र तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत आणि त्यांच्यापत्नी संगिता गावीत ह्या एकाचवेळी विजयी झाल्या आहेत़
भाजपाकडून नवापुर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत पराभूत झालेले भरत गावीत तालुक्यातील रायंगण जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करत होते़ तर त्यांच्या पत्नी संगीता ह्या करंजी बुद्रुक गटातून उमेदवारी करत होत्या़ दोघांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करत विजय प्राप्त केला़ संगीता गावीत यांचा ८ जानेवारी हा वाढदिवस असल्याने त्यांना वाढदिवसाची भेटच मिळाल्याचे त्यांनी सांगितले़ नवापुर तालुक्यातून काँग्रेसचे पाच, राष्ट्रवादी ३ तर भाजपाने दोन जागांवर विजय प्राप्त केला़ काँग्रेसचे उमराण, भरडू, निजामपूर, चिंचपाडा आणि बिलमांजरे येथील उमेदवार तर राष्ट्रवादीचे खांडबारा, चितवी आणि निजामपूर गटातून यश प्राप्त केले़ रायंगण आणि करंजी गटातून विजयी होणाऱ्या गावीत दाम्पत्याच्या रुपाने प्रथमच भाजपाचा नवापुर तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रवेश झाला आहे़

Web Title: Gavit couple won from Navapur taluka