शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

गंगोत्री फाऊंडेशनचा ‘प्रोटेक्ट ऑफ चिल्ड्रेन’चा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST

कोरोनाचा नवा स्ट्रेन आता लहान मुलांसाठीही धोकेदायक ठरु पाहत आहे. साधारणत: शून्य ते १५ वयोगटातील मुलांमध्ये अनेकवेळा कोरोनाची लागण ...

कोरोनाचा नवा स्ट्रेन आता लहान मुलांसाठीही धोकेदायक ठरु पाहत आहे. साधारणत: शून्य ते १५ वयोगटातील मुलांमध्ये अनेकवेळा कोरोनाची लागण झालेली असली तरी त्याचा तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह येईलच असे दिसून येत नाही. अनेकवेळा बाधित मुलांना विविध लक्षणे दिसतात तर काहींना ती लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. अशा मुलांसाठी व्हिटॅमिन व इतर औषधी ही महाग असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले पालक त्याकडे दुर्लक्ष करतात. या पार्श्वभूमीवर या मुलांना औषधोपचारासाठी मदत देता यावी यादृष्टीने शहादा येथील गंगोत्री फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजित मोतीलाल पाटील यांनी सांगितले की, माझ्या परिचयातील काही मुलांचा मी अनुभव घेतला. संबंधित पालकांनी औषधीसाठी खर्च जास्त लागत असल्याने मुलांच्या आजाराकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे यासंदर्भात शहादा व नंदुरबार परिसरातील काही बालरोग तज्ज्ञ डाॅक्टरांशी आपण चर्चा केली. त्या चर्चेतून लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याचे जाणवले. ही बाब आपण आपल्या काही मित्रांजवळ सांगितली. विशेषत: विदेशात स्थायिक असलेल्या काही मित्रांनी त्यासाठी थेट मदत देऊन या मुलांसाठी काही करण्याची सूचना केली. त्यानुसार बालरोग तज्ज्ञांशी चर्चा करून ‘प्रोटेक्ट ऑफ चिल्ड्रेन’ची संकल्पना तयार केली. या संकल्पनेनुसार शून्य ते १५ वयोगटातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुलांसाठी औषधीसाठी अडीच हजार रुपये रकमेची औषधी किट देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील काही बालरोग तज्ज्ञांचा ग्रुप तयार करण्यात आला असून त्यांच्या मार्गदर्शनानुसार हे काम सुरू राहील.

गेल्या वर्षी गंगोत्री फाऊंडेशनतर्फे पाच हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची किट वाटप केली होती. यावेळी आर्थिकदृष्ट्या दुर्बल एक हजार मुलांसाठी अडीच हजार रुपये किमतीची औषधी किट डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार देणार असून त्यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. या प्रकल्पाचा पुढे विस्तार करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न राहील.

-अभिजित मोतीलाल पाटील, अध्यक्ष, गंगोत्री फाऊंडेशन, शहादा