दुकानासह बँक फोडणारी अल्पवयीन टोळी जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:09 PM2020-09-24T12:09:08+5:302020-09-24T12:09:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोबाईल दुरूस्तीच्या दुकानातून ६५ मोबाईल चोरणारे आणि १५ दिवसांपूर्वी डीडीसी बँक फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ...

A gang of miners breaking into a bank with a shop is trapped | दुकानासह बँक फोडणारी अल्पवयीन टोळी जाळ्यात

दुकानासह बँक फोडणारी अल्पवयीन टोळी जाळ्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मोबाईल दुरूस्तीच्या दुकानातून ६५ मोबाईल चोरणारे आणि १५ दिवसांपूर्वी डीडीसी बँक फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीतील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दोन लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नंदुरबारातील बसस्थानक परिसरातील मोबाईल दुरूस्तीच्या दुकानातून चोरट्यांनी २० सप्टेबर रोजी रात्री दुकान फोडून दोन लाख ८१ हजार रुपयांचे ६५ मोबाईल लंपास केले होते. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या धाडसी चोरीमुळे व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे या चोरीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. एलसीबी आणि शहर पोलीस ठाण्याचे वेगवेगळे दोन पथक यासाठी तयार करण्यात येऊन तपासाला सुरूवात करण्यात आली. एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांना मिळालेल्या माहितीनुसार चोरी करणारी अल्पवयीन मुलांची टोळी असल्याचे स्पष्ट झाले. पथकांनी गिरिविहार गेट झोपडपट्टी, जोगनीमाता मंदीर, चार रस्ता येथील अल्पवयीन मुलांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले.
पथकांनी त्या ठिकाणी जाऊन तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांना एलसीबीच्या कार्यालयात आणले असता त्यांनी आपल्या इतर साथीदारांसह ही चोरी केल्याचे स्पष्ट केले. त्यांचे इतर साथीदार चिंचपाडा भिलाटीसह त्यांच्या परिसरातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. परंतु चोरीचा माल कुठे ठेवला ते माहिती झाल्यावर पोलिस पथकाने त्या घरात तपासणी केली असता चोरीचे ६५ मोबाईल आढळून आले. ते जप्त करण्यात आले आहेत. या अल्पवयीन मुलांच्या इतर साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
बँक फोडीचाही प्रयत्न
याच अल्पवयीन मुलांनी १५ दिवसांपूर्वी गिरिविहार कॉलनीलगतच्या इंदिरा व्यापारी संकुलातील डीडीसी बँक फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. या घटनेचा गुन्हा देखील ७ सप्टेबर रोजी उपनगर पोलिसात दाखल आहे. या घटनेत बँकेचे चॅनेल गेट तसेच आतील मुख्य दरवाजाचे गेट देखील तोडले होते.
तीन अल्पवयीन चोरट्यांसह पोलिसांनी दोन लाख ८९ हजार रुपये किंमतीचे मोबाईल जप्त केले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, पोलीस कर्मचारी राकेश मोरे, आनंदा मराठे, अभय राजपूत, शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक रवींद्र कळमकर, कर्मचारी संदीप गोसावी, भटू धनगर, इम्रान खाटीक, हेमंत बारी यांच्या पथकाने केली.

Web Title: A gang of miners breaking into a bank with a shop is trapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.