शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कुंभार समाजाचे भविष्य अंधकारमय; मातीचे चाक यंदाही थंडावले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:32 IST

गेल्या वर्षीदेखील वर्षभर घाम गाळून तयार केलेला माल घरातच पडून होता. यंदाही तो घेण्यास कोणीही ग्राहक पुढे येत नसल्यामुळे ...

गेल्या वर्षीदेखील वर्षभर घाम गाळून तयार केलेला माल घरातच पडून होता. यंदाही तो घेण्यास कोणीही ग्राहक पुढे येत नसल्यामुळे व्यवसायाला घरघर लागली आहे. यातून मार्ग कसा काढावा असा प्रश्न जिल्ह्यातील कुंभार समाजबांधवांना पडला आहे. शहादा शहरात व जिल्ह्यात कुंभार समाजाची मोठी वस्ती आहे. येथील समाजबांधव पारंपरिक माठ, रांजण, खापर, सणा-समारंभाला लागणारे दिवे, पणत्या, मातीच्या चुली, इत्यादी वस्तू मोठ्या प्रमाणावर बनवतात. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने माल बनवून ठेवला. मात्र या जीवघेण्या आजारामुळे सर्वत्र लॉकडाऊन, त्यामुळे ठप्प झालेले दळणवळण आणि तयार माल घरीच पडून आहे. यासाठी कर्जरूपी गुंतवलेले भांडवल वसूल होते की नाही याची चिंता या व्यावसायिक बांधवांना लागली आहे.

आखाजीवर मंदीचे सावट

कुंभार समाजबांधवांसाठी अक्षय्यतृतीया अर्थातच आखाजी हा अतिशय महत्त्वाचा सण आहे. या दिवशी वाडवडिलांचे श्राद्ध घालण्याची परंपरा खानदेशात पूर्वापार पद्धतीने चालत आलेली आहे. यासाठी मातीच्या घागरींना विशेष महत्त्व असते. लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाला असून, जीवन अंधकारमय झाले आहे, असे भावनिक उद्‌गार येथील व्यावसायिक बंधूंनी काढले आहे.

अक्षय्यतृतीया व उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या मातीच्या वस्तूंना मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही मागणी नसल्यामुळे समाजबांधवांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. यातून सावरण्यासाठी शासनाने आर्थिक मदत करावी. शासनाने आर्थिक पॅकेज जाहीर करून मदत करावी; जेणेकरून पारंपरिक व्यवसायाला चालना मिळून कुंभार समाजाची उपासमार होणार नाही.

- हृदयेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष, नंदुरबार जिल्हा कुंभार समाज संघटना