पालिका देणार शेतकऱ्यांना मोफत खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 02:07 PM2020-02-25T14:07:42+5:302020-02-25T14:08:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील गोळा झालेल्या कचºयावर बायोमायनिंग प्रक्रिया केल्यानंतर कचºयापासून खत तयार होते. हे खत शेतीसाठी ...

Free fertilizer for farmers to provide municipality | पालिका देणार शेतकऱ्यांना मोफत खत

पालिका देणार शेतकऱ्यांना मोफत खत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील गोळा झालेल्या कचºयावर बायोमायनिंग प्रक्रिया केल्यानंतर कचºयापासून खत तयार होते. हे खत शेतीसाठी उपयुक्त असून, शेतकऱ्यांना फायद्याचे ठरणार आहे. बायोमायनिंग प्रक्रियेत तयार झालेले खत शेतकºयांना मोफत दिले जाणार आहे. शेतकºयांनी तसा अर्ज नगरपालिकेत देऊन खत घेऊन जावे, अशी माहिती नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी दिली.
शहराबाहेरील दोंडाईचा रस्त्यावर असलेल्या चार एकरावर नगरपालिकेचा डम्पिंग ग्राऊंड व बायोमायनिंग प्रकल्पाची पाहणी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अभिजीत पाटील, उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, आरोग्य सभापती वर्षा जव्हेरी, नगरसेवक आनंदा पाटील, संदीप पाटील, नाना निकुंभे, राजेंद्र जव्हेरी, मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ, अभियंता संदीप चौधरी, स्वच्छता निरीक्षक राजेंद्र चव्हाण, लोटन धोबी, अजित बाफना, चेतन गांगुर्डे, गोटू तावडे, किसन चौधरी आदींसह शहरातील नागरिक उपस्थित होते. या वेळी बायोमायनिंग प्रकल्पाविषयी माहिती देताना अभिजित पाटील म्हणाले की, शहरातील विविध भागातून रोज कचरा जमा होत असतो. जमा झालेला कचरा हा शहराबाहेरील नगरपरिषदेच्या दोंडाईचा रोडवरील कचरा डेपोत जमा केला जातो.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहादा नगर परिषदेच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प शासनाने मंजूर केलेला आहे. प्रकल्पांतर्गत बायोमायनिंग हा एक महत्त्वपूर्ण घटक असून, त्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार १.४६ कोटींची तरतूद बायोमायनिंग घटकासाठी केलेली आहे.
शहादा नगर परिषदेच्या दोंडाईचा रोडवरील कचरा डेपो येथील कचºयावर बायोमायनिंग प्रक्रिया करून तेथील ९० टक्के जागा रिकामी करणे असा शासनाचा हेतू आहे. प्रक्रिया केल्यानंतर कचºयापासून खत तयार होते. या खताची चाचणीही नाशिक येथील अश्वमेध लॅब येथून करण्यात आली आहे. हे खत शेतीसाठी उपयोगाचे आहे. त्यामुळे ज्यांना खत घ्यावयाचे असेल त्यांनी तसा अर्ज सादर करून नगर परिषदेकडून तशी परवानगी घ्यावी. हे काम निविदा प्रक्रिया राबवून या क्षेत्रातील अनुभवी मक्तेदार पी.एच. जाधव पुणे यांना देण्यात आले असून, आतापर्यंत जवळजवळ ४५ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामदेखील महिनाभरात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हे काम पूर्ण झाल्यावर त्या जागेवर कम्पाऊंड वॉल व इतर कामे करण्याचा नगरपरिषदेचा मानस असल्याचे पाटील यांनी सांगितले.
शहरांमध्ये प्रक्रिया न करता साठविलेल्या कचºयावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याची बायोमायनिंग ही एक नावीन्यपूर्ण प्रक्रिया आहे. वर्षानुवर्षे पडून असलेल्या कचºयावर बायोमायनिंगद्वारे प्रक्रिया करणे म्हणजे ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यात येतो. यात ओल्या कचºयाचे कम्पोस्टिंग करण्यात येणार आहे तर न कुजणाºया वस्तुंचे रिसायकलिंग केले जाणार आहे. या प्रक्रियेत चाळणी करून प्लास्टिक कचरा बाजूला होतो व कंपोस्ट खत तयार करण्यात येते.
हा बायोमायनींग प्रकल्प मार्चअखेर पूर्ण होणार असून, त्यानंतर संपूर्ण चार एकर जागेला वॉल कम्पाऊंड करण्यात येऊन तेथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भविष्यात येथे ओल्या व सुक्या कचºयावर प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असून, शहरात दररोज निर्माण होणाºया सुमारे तीन ते चार टन कचºयावर प्रक्रिया केली जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पात जवळपास ९० टक्के क्षेत्र मोकळे होणार असल्याने डम्पिंग ग्राऊंडचे स्वरूप बदलणार आहे.

Web Title: Free fertilizer for farmers to provide municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.