नोकरीच्या बहाण्याने नऊ लाख रुपयात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:18 IST2020-06-17T12:18:33+5:302020-06-17T12:18:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नोकरी लावू देण्याच्या बहाण्याने तिघांकडून नऊ लाख रुपये घेत त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस ...

Fraud of Rs 9 lakh under the pretext of job | नोकरीच्या बहाण्याने नऊ लाख रुपयात फसवणूक

नोकरीच्या बहाण्याने नऊ लाख रुपयात फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नोकरी लावू देण्याच्या बहाण्याने तिघांकडून नऊ लाख रुपये घेत त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
लक्ष्मण वासुदेव पाटील रा़ आव्हाणे धनगरवाडा असे फसवणूक करणाऱ्याचे नाव आहे़ त्याने जयकुमार युवराज चित्ते रा़ ज्ञानदिप सोसायटी, नंदुरबार याच्यासह आणखी दोघांकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेतले होते़ २०१६ व २०१७ मध्ये पैसे घेऊनही नोकरी न दिल्याने तिघांनी पोलीसात अर्ज केला होता़ अर्जाची दखल घेऊन सोमवारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते़ त्यानुसार संशयित लक्ष्मण पाटील याच्याविरोधात जयकुमार चित्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील बिºहाडे करत आहेत़

Web Title: Fraud of Rs 9 lakh under the pretext of job