फरशीपूल तुटल्याने तळोदा तालुक्यातील चार गावे संपर्काबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:44 IST2019-08-16T12:44:03+5:302019-08-16T12:44:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रतापपूर : तळोदा तालुक्यातील राणीपूर ते प्रतापपूर दरम्यान फरशीपुल तुटल्याने चार गावे अद्यापही संपर्काबाहेर आहेत़ रस्ता ...

Four villages in Taloda taluka are out of touch due to the breaking of the floor | फरशीपूल तुटल्याने तळोदा तालुक्यातील चार गावे संपर्काबाहेर

फरशीपूल तुटल्याने तळोदा तालुक्यातील चार गावे संपर्काबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रतापपूर : तळोदा तालुक्यातील राणीपूर ते प्रतापपूर दरम्यान फरशीपुल तुटल्याने चार गावे अद्यापही संपर्काबाहेर आहेत़ रस्ता नसल्याने चारही गावातील नागरिक खर्डी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातून मार्गस्थ होत आहेत़ 
तळोदा तालुक्यात गेल्या आठवडय़ात झालेल्या अतीवृष्टीमुळे सातपुडय़ात उगम पावणा:या नदी नाल्यांना पुर आले होत़े परिणामी पायथ्याशी असलेल्या गावांमधील रस्ते आणि फरश्या वाहून गेल्या आहेत़ पूरस्थिती ओसरल्यानंतर आता परिस्थिती सामान्य होत असली तरीही राणीपूर, खर्डी, सावरपाडा आणि बंधारा ही गावे संपर्काबाहेरच आहेत़ या गावांकडे जाण्यासाठी प्रतापपूर- राणीपूर हा सोयीचा रस्ता आह़े परंतू राणीपूर गावाजवळील फरशी खर्डी नदीच्या पुरामुळे तुटल्याने वाहतूक बंद झाली आह़े यातून चारचाकी वाहनांची वाहतूक तसेच एसटी बसही बंद झाली आह़े गेल्या चार दिवसांपासून या गावांमधील विद्यार्थी तळोदा आणि प्रतापपूर येथील शाळा महाविद्यालयांमध्ये आलेले नसल्याची माहिती आह़े तुटलेल्या फरशीवरुन पाणी वाहत असल्याने तेथून पायी चालणेही मुश्किल होत आह़े सावरपाडा ते धनपूर असा बोरदकडून दुसरा रस्ता असला तरी त्या मार्गानेही नदी नाले दुथडी भरुन वाहत असल्याचे सांगण्यात येत आह़े प्रशासनाने याठिकाणी पर्यायी व्यवस्था करुन मदत करण्याची मागणी करण्यात आली आह़े 
राणीपूर ते प्रतापपूर दरम्यान फरशी ऐवजी मोठा पूल बांधण्याची चारही गावातील ग्रामस्थांची जुनी मागणी आह़े परंतू तालुका प्रशासनाने त्याकडे गांभिर्याने लक्ष दिलेले नाही़ या भागात अनेक ठिकाणी शेतशिवारातही पाणी गेले असून फरशीपुल बाधित झाल्याने महसूली कर्मचा:यांनाही येण्यास अडचणी आल्याने कारवाई होत नसल्याची माहिती चारही गावातील नागरिकांकडून देण्यात आली आह़े 
 

Web Title: Four villages in Taloda taluka are out of touch due to the breaking of the floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.