चार टक्के पीक कर्जवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:06 IST2020-05-13T12:06:30+5:302020-05-13T12:06:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरीप पिक कर्ज वाटपाची गती संथावली आहे़ जिल्हा बँक वगळता इतर बँकांमध्ये ...

चार टक्के पीक कर्जवाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरीप पिक कर्ज वाटपाची गती संथावली आहे़ जिल्हा बँक वगळता इतर बँकांमध्ये कर्जवाटप केवळ नावलाच असल्याने सर्व बँकांनी मिळून केवळ ३़६० टक्के कर्जाचे वाटप केल्याचे समोर आले आहे़ महात्मा फुले कृषी कर्जमाफी रखडल्याने शेतकऱ्यांना कर्जाचा परतावा करणेही शक्य न झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर थकबाकी दिसत असल्याने अडचणी वाढल्या आहेत़
जिल्हा प्रशासनाने यंदाच्या खरीप हंगाम २०२०-२१ साठी १०० टक्के कर्जवाटप करण्याचे निर्धारित केले आहे़ यांतर्गत धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ६० कोटी ७५ लाख, जिल्ह्यातील ११ राष्ट्रीयकृत बँकांना ४५७ कोटी ३० लाख, ग्रामीण बँकेला १३ कोटी ३१ लाख तर खाजगी बँकांनी किमान ८४ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ सप्टेंबर अखेरपर्यंत होणाºया या कर्जवाटपाचा जिल्हा प्रशासन वेळोवेळी आढावा घेऊन माहिती घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ दरम्यान एप्रिलपासून सुरु झालेल्या कर्जवाटपात केवळ जिल्हा बँकेने आघाडी घेतली असून त्यांनी आतापर्यंत त्यांना दिलेल्या लक्षांकाच्या ३१ टक्के कर्जाचे वाटप पूर्ण केले आहे़ जिल्हा बँकेच्या जिल्ह्यात २९ शाखा आहेत़ यात ३०७ विविध कार्याकारी संस्था आणि १७ हजाराच्या जवळपास स्वतंत्र खातेदारांचा समावेश आहे़ जिल्हा बँकेतून कर्ज घेणारे ६० टक्के खातेदार हे केवळ तीन ते सहा महिन्याच्या आत कर्जाचा परतावा करत असल्याने बँकेची स्थिती समाधानकारक आहे़
सहकारी बँकेची स्थिती चांगली असताना राष्ट्रीयकृत बँकानी केवळ १ टक्का कर्ज वाटप केले आहे़ गेल्या काही दिवसात कर्जवाटपात येणाºया अडथळे दूर करण्यासाठी शासनाकडून आदेश देण्यात येऊन अधिकाºयांच्या नियुक्त्या करण्याचे आदेश आहेत़ यांतर्गत जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना २०१९ या योजनेत पात्र २७ हजारापेक्षा अधिक शेतकºयांना नव्याने पीक कर्ज मिळण्यास अडचणी येत असल्याचे दिसून आले होते़ यातून शासनाकडून कर्जवाटप सुरळित होऊन ग्राम, तालुका आणि जिल्हा स्तरावर शेतकºयांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांतर्गत पालक अधिकारी नियुक्त केले आहेत़ हे अधिकारी नवीन सभासदांना क व म पत्रक मंजूर करणे, नियमित कर्जदारांना कर्जवाटप करणे, कर्जमाफी योजनेचा आढावा घेणे, नवीन सभासद, बिगर कर्जदार व थकबाकीदारांना कर्जवाटप करणे, ५० पैश्यांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावातील शेतकºयांना पुर्नगठनासाठी संमती पत्राचा आढावा घेणे, किसान के्रडीट कार्ड यासह विविध बाबींचा आढावा घेणार आहेत़ सहा तालुक्यात जिल्हा उपनिबंधकांनी ३० अधिकारी यासाठी नियुक्त केले असल्याची माहिती आहे़
जिल्ह्यातील सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, ग्रामीण बँक आणि खाजगी बँकांनी मिळून ६१५ कोटी ९८ लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्याचे निर्धारित करण्यात आले आहे़ तब्बल ७२ हजाराच्या जवळपास शेतकऱ्यांना प्रशासनाने कर्जपुरवठा होईल याकडे लक्ष देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत़ परंतू प्रत्यक्षात मात्र कर्जवाटपाबाबत गेल्यावर्षी असलेली उदासिनता यंदाही दिसून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे़ राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांकडून कर्जमाफी योजनेंतर्गत नीलचा दाखला आणि तलाठींकडून बोजा उतरवण्याचा सातबारा यांची मागणी करुन इतर कागदपत्रे वाढवून फिरवाफिरव करत आहेत़ तूर्तास कोरोनामुळे शेतकºयांना बँकांमध्ये येण्यास अडचणी येत असल्याने कर्जवाटप करण्याबाबत सोयीस्कर मार्ग काढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़
४जिल्हा बँकेच्या २९ शाखांमधून आतापर्यंत विविध कार्यकारी संस्था आणि थेट कर्जदार यांना रुपे कार्डच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यात येत आहे़ सोमवार अखेरीस बँकेने २ हजार ३९१ कर्जदारांना २३ कोटी ४१ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे़ यात विविध कार्यकारी संस्थांचाही समावेश करण्यात आला आहे़ बँकेने दोन महिन्याच्या काळातच ३९ टक्के कर्जवाटप केले आहे़ शेतकऱ्यांना बॅकेत येऊन अडचणी येऊ नये यासाठी सर्वांना रुपे कार्ड दिल्याने शेतकरी एटीएममधून पैसे काढत आहेत़
४राष्ट्रीयकृत बँकांना मोठे उद्दीष्ट्य असताना आतापर्यंत ११ राष्ट्रीयकृत बँकांनी मिळून केवळ २३१ शेतकऱ्यांना ३६ लाख ९० हजार रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे़ केवळ एक टक्के कर्ज वाटप त्यांनी केले आहे़
४ग्रामीण बँकेने ३१ शेतकºयांना ३१ लाख तर खाजगी बँकांनी २२ शेतकºयांना ३४ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे़