विसरवाडीनजीक मालवाहूू रिक्षा व दुचाकी अपघातात चार जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 12:39 IST2018-05-25T12:39:43+5:302018-05-25T12:39:43+5:30

Four people injured in a road accident in a cargo rickshaw and a two-wheeler | विसरवाडीनजीक मालवाहूू रिक्षा व दुचाकी अपघातात चार जण जखमी

विसरवाडीनजीक मालवाहूू रिक्षा व दुचाकी अपघातात चार जण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : मोरकारंजा ता़ नवापूूर शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने 4 जण जखमी झाल़े ही घटना 19 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली होती़ जखमींचे जाबजबाब पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला़ 
धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मोरकारंजा शिवारात एमएच 04 डीके 6994 या चारचाकी वाहनाने समोरून येणा:या एमएच 39 एए 3729 या दुचाकीस धडक दिली होती़ यात दुचाकीवरील विष्णू  जाल्या गावीत रा़ बर्डीपाडा, फिलीप किरण गावीत रा़ मोरकारंजा, सिद्धार्थ चिका गावीत रा़ पानबारा व वाहीद शहा सत्तार शहा हे चौघे जखमी   झाल़े 
याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल भिमसिंग ठाकरे यांनी दिलेल्या खबरीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास हेड कॉन्स्टेबल ठाकरे करत आहेत़ 

Web Title: Four people injured in a road accident in a cargo rickshaw and a two-wheeler