शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

लाकूडसह चार लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:40 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापूर वन विभागाच्या पथकाने अवैधरित्या लाकूड वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहन व लाकूड मिळून चार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नवापूर वन विभागाच्या पथकाने अवैधरित्या लाकूड वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहन व लाकूड मिळून चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. साग व शिसम प्रजातीच्या चौपाटाची अवैध वाहतूक केली जात होती.वनविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास नवापूरचे वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांना लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार वनविभागाचे पथक घेऊन शासकीय वाहन व खाजगी मोटारसायकलने त्यांनी संशयीत वाहनाचा पाठलाग केला. राष्ट्रीय महामार्गावर सावरटफाटा येथे रस्त्यावर जीप (क्रमांक जी.जे.१६ एए- ०६७४) चालक वाहन सोडून पसार झाला. वाहनाची तपासणी केली असता त्यात अवैधरित्या वाहतूक होत असलेले साग व शिसम चौपाट भरलेले आढळून आले. घटनास्थळावर पंचनामा करुन मुद्देमालासह वाहन नवापूर येथील शासकीय विक्री आगारात जमा करण्यात आले. तेथे जप्त मुद्देमालाचे मोजमाप घेतले असता साग व शिसम चौपाटाचे एकुण ८१ नग मिळून आले. घटनेबाबत नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांनी प्रथम गुन्हा नोंद केला. जप्त मुद्देमाल व वाहनाची एकुण अंदाजे किंमत चार लाख रुपये आहे. या कारवाईत प्रथमेश हाडपे, वनपाल डी.के. जाधव, ए.एन. चव्हाण, वनरक्षक प्रशांत सोनवणे, कल्पेश अहिरे, सतीश पदमोर, लक्ष्मण पवार, संतोष गायकवाड, संजय बडगुजर, कमलेश वसावे, नितीन पाटील व अशोक पावरा यांनी सहभाग घेतला. पुढील तपास उपवनसंरक्षक नंदुरबार विभागीय वनाधिकारी दक्षता पथक धुळे व सहायक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली वडकळंबीचे वनपाल डी.के. जाधव हे करीत आहेत.