नंदुरबारनजीक पावणेचार लाख रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:20 IST2019-10-01T12:20:36+5:302019-10-01T12:20:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार नजीक एका रिक्षातून तपासणी दरम्यान पावणेचार लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. संबधीतांना ...

Four lakh cash seized near Nandurbar | नंदुरबारनजीक पावणेचार लाख रोकड जप्त

नंदुरबारनजीक पावणेचार लाख रोकड जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार नजीक एका रिक्षातून तपासणी दरम्यान पावणेचार लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. संबधीतांना रक्कमेविषयी योग्य उत्तर देता न आल्याने चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. 
नंदुरबारनजीक आरटीओ चेक नाक्यावर चार वाजता एका रिक्षाची (क्रमांक एमएच-39-ई-9321) या रिक्षेची तपासणी करण्यात आली. रिक्षातील चालकाच्या डिक्कीत डिक्कीत रोख तीन लाख 82 हजार 700 रुपये आढळून आले.  याबाबत जुनी सिंधी कॉलनी येथे राहणा:या रिक्षातील दोघांना विचारणा करण्यात आली असता त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. रक्कम तहसील कार्यालयात आणून संबंधितांसमोर रोकड गणना करण्यात आली. सदर रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली असून जिल्हास्तरीय समिती त्याविषयी संपूर्ण चौकशी करणार आहे. जिल्ह्यात स्थिर आणि भरारी पथकामार्फत आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर कडक लक्ष देण्यात येत आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी चार पथके कार्यकरत करण्यात आली असून त्यात महसूल, उत्पादन शुल्क आणि पोलीस विभागातील कर्मचा:यांचा समावेश आहे. या पथकांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Four lakh cash seized near Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.